आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CIDCO Administrato, Latest News In Divya Marathi

सिडको प्रशासकांनी ऐकले नागरीकांचे गार्‍हाणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- वाळूज महानगरातील सिडकोच्या नगर क्रमांक एक व दोनमधील नागरी सेवा सुविधांबाबत रहिवाशांनी मांडलेल्या विविध समस्यासंदर्भात गार्‍हाणे ऐकून सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांनी या समस्या आगामी काही दिवसांत सोडविण्याचे आश्वासन दिले. संबंधित अधिकार्‍यांना त्यांनी शुक्रवारी (24 मे)जागेवरच निर्देश दिले.
नगर क्रमांक तीनमधील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांची मते जाणून घेऊन त्यांनी मुंबईतील ‘नयना’ प्रकल्पाच्या धर्तीवर वाळूज भागाचा विचार करावयाचा झाल्यास, 40/60 चा प्रस्ताव आल्यास त्याबाबत विचार करण्याचे सूतोवाचही केले. याबाबत शेतकर्‍यांनी पुढील बैठकीपर्यंत निर्णय घेण्याचे आवाहन केंद्रेकर यांनी केले.

वाळूज भागातील सिडकोच्या नगर क्रमांक एक ते सातच्या विकासकामासंदर्भात 9 मे रोजी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्या उपस्थितीत वाळूज कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली होती. अधिकार्‍यांचा मोठा ताफा या बैठकीला उपस्थित होता. त्या वेळी नगर क्रमांक एक व दोनमधील काही नागरिकांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भाटिया यांना सेवा-सुविधांबाबत निवेदने दिली होती. त्यावर सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर हे निर्णय घेतील. त्यासाठी 23 मे रोजी वाळूज महानगरातील सिडको कार्यालयात नागरिकांची बैठक घेण्याचे निर्देश भाटिया यांनी दिले होते. त्यानुसार शुक्र वारी सकाळी साडेअकराला बैठक घेण्यात आली. या बैठकीला रहिवाशांनी एकच गर्दी केली होती.
येथील उद्याने, विविध रस्ते त्याचबरोबर विविध चौकांतील रस्त्यांवरील वर्दळ पाहता उभारण्यात येणारे वाहतूक सिग्नल, पथदिवे, स्मशानभूमीचा विकास, एसटीपी प्लँटचे काम आदी विषयांवर बैठकीत सखोल चर्चा क रून त्याचा आढावा घेण्यात आला. पिण्याच्या पाण्याच्या निश्चित वेळा ठरवाव्यात, वाढीव सेवाकराचा पुनर्विचार करावा, पथदिवे सुरू करावेत आदी मागण्या या वेळी मांडण्यात आल्या. त्यावर केंद्रेकर यांनी या सुविधा तातडीने देण्याचे आश्वासन दिले.
यशवंत चौधरी, राकेश सक्सेना, सतीश उदावंत, दत्तात्रय निसाळ, उत्तम ठोकळ, विष्णू जाधव यांच्यासह इतर नागरिकांनी चर्चेत भाग घेतला. सिडकोचे अधीक्षक अभियंता राजेंद्रसिंह सिसोदिया, प्रणिता तायडे, राजेंद्र शहापूरकर व इतर अधिकारी या वेळी उपस्थित होते.