आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडको बिअर शॉपी बंद; नागरिकांच्या पवित्र्याला यश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सिडको एन-3 भागातील टॉडलर्स शाळेजवळ थाटलेली बिअर शॉपी अखेर जनतेच्या रेट्यापुढे बंद करण्यात आली आहे दिव्य मराठी - डीबी स्टारने याबाबत सर्व प्रथम बातमी प्रसिद्ध करून नागरिकांच्या भावनांना वाचा फोडली होती. त्या दबाबामुळे शॉपी मालकाने सोमवारी (23 डिसेंबर) दुकान बंद करून गाशा गुंडाळला.

सिडको एन-3 भागात ऐन दिवाळीत पवन बिअर व वाइन शॉपी नावाचे दारूचे दुकान सुरू झाले होते. या दुकानाला तेथील नागरिकांसह नगरसेवक प्रमोद राठोड यांनीही विरोध केला होता तसेच टॉडलर्स शाळेने देखील दुकान बंद करावे म्हणून जिल्हाधिकार्‍यांना पत्र दिले होते. नागरिकांच्या सह्यांची मोठी मोहीमही त्यांनी राबविली होती. याबाबत डीबी स्टार ने 4 डिसेंबर व 5 डिसेंबर रोजी शाळेजवळच थाटली बिअर शॉपी या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून या समस्येला वाचा फोडली होती. या भागातील महिला व पुरुषांनीही बैठक घेऊन हे दुकान बंद करण्याचा निर्धार केला होता, कारण शालेय विद्यार्थी व महिला त्या दुकानामुळे त्रस्त होत्या. नागरिकांनी नगरसेवकामार्फत जिल्हाधिकारी व उत्पादन शुल्क विभागालाही तक्रारीचा अर्ज दिला होता. पण त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. अखेर नागरिकांनी डीबी स्टारकडे आपली कैफियत मांडून ते दुकान बंद करण्यासाठी मतदानाला सामोरे जाण्याची तयारी सुरू केली होती. त्यामुळे शॉपीचालकाने दुकान बंद केले.हे दुकान बंद होताच त्या वॉर्डात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी दिव्य मराठीचे आभार मानले.