आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडको घरांच्या मालकीबाबत अध्यक्ष हिंदुराव अनभिज्ञच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सिडकोतील नागरिकांना घरांचा मालकीहक्क, साताºयातील ना हरकत प्रमाणपत्रासंदर्भात सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी हात वर केले. ही प्रकरणे मला माहितीच नाहीत, असे सांगून त्यांनी जबाबदारी झटकण्याचाही प्रयत्न केला.
सिडकोतील 22 हजार नागरिकांना 99 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर (लीज होल्ड) घरे देण्यात आली आहेत. 2006 मध्ये सिडकोची वसाहत महानगरपालिकेकडे हस्तांतर करताना मालकीहक्क देऊ, असे तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले होते. विधी मंडळात आमदारांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केले होते. अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यावर दुसºयांदा हिंदुराव औरंगाबादेत आले. सोमवारी पत्रकार परिषदेत ते म्हणाले, की, नेमकी काय मागणी आहे व याची माहिती मी आता घेत आहे. टोपेंच्या आश्वासनाविषयीही मला माहिती नाही. एखाद्या प्रकरणात घाईत निर्णय घेणे अंगलट येते.
साता-यासंबंधी माहिती नाही- सिडकोला सातारा गावासाठी विशेष प्राधिकरण म्हणून नेमले आहे. सिडकोच्या नाहरकत प्रमाणपत्राशिवाय जिल्हाधिकारी कार्यालय एन ए-45 चे एन. ए. 47 (बी) करीत नाही. सिडको परवानगीसाठी झुलवत ठेवते, या मुद्द्यावर हिंदुराव यांनी ‘मला काहीही माहिती नाही’, असे सांगितले.
झालर आराखडा डिसेंबरअखेर- तीन महिन्यांत झालरक्षेत्राचे सर्वेक्षण पूर्ण होईल. डिसेंबर 2012 पर्यंत आराखडा प्रसिद्ध केला जाईल. झालरक्षेत्रात 2.5 एफएसआय दिल्यास सेवा सुविधांवर ताण पडेल. 1.5 एफएसआय देणे शक्य आहे. आराखडा अंतिम झाल्यावर प्रकल्पग्रस्तांसाठी टीडीआर, एफएसआयचे धोरण ठरविले जाणार आहे, असे ते म्हणाले.
865 घरांची योजना - वडगाव कोल्हाटी परिसरातील सिडकोच्या जागेवर उच्च्, मध्यम व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी घरांची योजना राबवण्यात येणार आहे. घरांची सोडत पद्धतीने विक्री केली जाईल. यासंबंधीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाणार आहे. एमजीएमलगतच्या वसाहतींमध्ये सिडकोतर्फे योजना राबवली जाणार नाही. ही जागा गृहनिर्माण संस्थांना देण्यात येणार आहे.