आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिफ्ट मागणार्‍या महिलेने व्यापार्‍याचे 5 लाख लुटले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मुलाला रुग्णालयात नेण्याचा बहाणा करून लिफ्ट मागणार्‍या महिलेने सिडकोतील व्यापार्‍याला लुटल्याची घटना गुरुवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास जळगाव रोडवर घडली. सुमेध गुप्ता असे या व्यापार्‍याचे नाव असून, रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता.

कॅनॉट प्लेसमधील दुकान बंद करून गुप्ता कारने घरी परतत होते. सिडको एन-1 भागात एका महिलेने हात दाखवत त्यांना थांबवले. मुलाला रुग्णालयात नेण्याचे कारण सांगून तिने लिफ्ट मागितली. गुप्ता यांनी तिला हसरूल टी पॉईंटजवळ सोडले. याचवेळी आणखी तिघे त्यांच्या कारमध्ये शिरले. गुप्ता यांना बाहेर ढकलून त्यांनी कार आणि पाच लाख रुपयांसह पळ काढला. कार फुलंब्रीच्या दिशेने गेल्याचे गुप्ता यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला कळवले. त्यानंतर ग्रामीण पोलिसांनी शोध सुरू केला. सहायक पोलिस आयुक्त विजय पवार या प्रकरणी चौकशी करत असल्याची माहिती उपायुक्त अरविंद चावरिया यांनी दिली.