आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडको अन् नगररचना विभागात जुंपली !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अठ्ठावीस गावे झालर क्षेत्र योजनेच्या प्रारूप विकास आराखड्यावर आलेल्या सूचना व हरकतींवरील सुनावणीत झालरक्षेत्र नियोजन समितीमध्ये मतभिन्नता झाली. सातसदस्यीय समितीमधील पाच जणांनी सुचविलेल्या शिफारशी दोघांनी रद्द केल्या आहेत. पार्किंग, मॉल, स्टेडियम, फशि मार्केट, प्राथमिक शाळा आदी आरक्षण रद्द करण्याची शिफारस दोघा सदस्यांनी नाकारली असून उपरोक्त आरक्षणाची आवश्यकता असल्याचे नमूद केले आहे.
झालर क्षेत्राचा प्रारूप आराखडा पुन्हा एकदा नियोजन समितीच्या मतभिन्नतेमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. समितीमधील नगररचना विभागाशी संबंधित सदस्यांनी स्वतंत्र अहवाल पाठविला असून सिडकोचे अतिरक्त मुख्य नियाेजनकार तथा नियोजन समितीचे चेअरमन रमेश डेंगळे यांच्या अधिपत्याखालील पाच जणांनी स्वतंत्र अहवाल पाठवला आहे. त्यामुळे सिडको आणि नगररचना विभाग असे दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. सिडकोने बनवलेला आराखडा नगररचना विभागाने रद्द ठरवला. नंतर नगररचना विभागाने बनविलेल्या आराखड्यावर २३०० सूचना व हरकती आल्या. पाच सदस्यांनी यात ८०० पेक्षा जास्त सुधारणा सुचवल्याने नगररचना विभागाच्या दोघा सदस्यांनी आपला स्वतंत्र अहवाल शासनाकडे पाठवून आपणही सिडको अधिकाऱ्यांच्या मताशी सहमत नसल्याचे दाखवून दिले.
सुंदरवाडीचा कत्तलखाना हलवणे.
झाल्टा येथील शॉपिंग मॉल हलवून जागेचा वापर निवासी क्षेत्रासाठी करणे.
गांधेलीतील ५१ हेक्टरवरील ट्रक टर्मिनल हलवून जागा निवासी क्षेत्रासाठी राखून ठेवणे. २ हेक्टरवरील मलनसि्सारण प्रकल्प हलवून जागा निवासी करणे व स्टेडियमची जागा ३१ हेक्टरवरून १५ हेक्टर कमी करणे. दफनभूमी,सांस्कृतिक केंद्राचे स्थलांतर.
आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठीची घरांची योजना रद्द.
आहेर येथील शॉपिंग मॉल व वाहनतळ हलवणे, पसिादेवीचे बसस्थानक, फशि मार्केट व स्टेडियम हटवून जागा निवासी व शेतीस राखून ठेवणे. समाजकल्याण विभागाचे वसतगिृह रद्द करणे.
शॉपिंग प्लाझा मांडकी येथे हलवणे. फत्तेपूर येथील भाजीपाला बाजार व व्यापार केंद्र हलवणे.
सावंगीतील फशि मार्केट, बाजार, वाहनतळ, कमर्शिअल मार्केट हलवणे, स्टेडियमसाठी २५ हेक्टर जागा निर्धारित केली होती. उपरोक्त स्टेडियम इतरत्र हलवून जागा शेतीसाठी राखीव.
कृष्णापूरचे ट्रक टर्मिनल रद्द करून जागा शेतीसाठी ठेवली. देवळाईचे फशि मार्केट हलवले.

झाल्टा शॉपिंग मॉल कायम ठेवून येथील ट्रक टर्मिनलचे आरक्षण.
आर्थिक दुर्बल घटकांची घरांची योजना कायम करावी.
गांधेली येथील स्टेडियम वगळून खेळाच्या मैदान. दफनभूमी, स्मशानभूमी, मच्छी मार्केट, सांस्कृतिक सभागृह, शॉपिंग मॉल कायम.
मांडकी येथील शॉपिंग मॉल सिडकोऐवजी जमीन मालकास विकसित करण्यास द्यावे. समाजकल्याण वसतगिृहासाठी १.६० हेक्टर जागेची गरज नाही. आहेरला शॉपिंग मॉल व वाहनतळ आवश्यक.

पिसादेवी येथील बसस्थानक कायम करून वाहनतळ स्टेडियममध्ये. गट नं. ९ व १३६ मधील खासगी क्षेत्र वगळावे. सावंगी येथील स्टेडियम शासकीय व देवगिरी साखर कारखान्याच्या जागेवर उभारावे. देवळाईत फशि मार्केटऐवजी शॉपिंग सेंटरची जागा निवासी करावी.

सातारा येथील गट नं. २६५ व २६६ वर ३९ हेक्टरचे आरक्षण असून यातील १० हेक्टर जागा खेळाच्या मैदानासाठी ठेवावी व उर्वरित जागा शैक्षणिक वापरासाठी ठेवण्याची शिफारस केली. साताऱ्यातील ट्रक टर्मिनल हलवून जागेचा निवासी वापर प्रस्तावित केला. गेवराई तांड्याचा दवाखाना कायम केला असून सांस्कृतिक केंद्र व मलनसि्सारण प्रकल्प कायम.