आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाळूज -वडगाव कोल्हाटीवासीयांची पाण्यासाठी दरवर्षी होणारी भटकंती कायमची थांबणार आहे. ग्रामपंचायत पदाधिका-यांनी नुकतीच सिडकोचे प्रशासक सुनील केंद्रेकर यांची भेट घेऊन पाणीपुरवठ्यासाठी सिडकोच्या जलवाहिनीचा वापर करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती केली. त्यास केंद्रेकर यांनी मान्यता दिल्याने एमआयडीसीचे पाणी सिडकोच्या जलवाहिनीद्वारा वडगाववासीयांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या भारत निर्माण पाणीपुरवठा योजनेचा काय उपयोग, असा सवाल उपस्थित होत आहे.
प्रशासनाचा अंदाज चुकला
भारत निर्माण पाणीपुरवठा योजना राबवण्यापूर्वी पुढील 20 वर्षांचा आराखडा तयार करूनच कामाला सुरुवात केली जाते . भविष्यात संबंधित गावातील लोकसंख्येत वाढ झाली तरी पाण्याची कमतरता भासणार नाही, असे नियोजन केले जाते. मात्र, संबंधित योजनेमध्ये वाढीव लोकसंख्येमुळे पाण्याची टंचाई किंवा सदरील योजनेतून मिळणारे पाणी अपुरे पडत असल्यामुळे अन्य मार्गाने पाणी उपलब्ध करण्याची वेळ ग्रामपंचायत प्रशासनावर आली आहे.
1 कोटी रुपयांची बचत
एमआयडीसीच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीला स्वतंत्र जलवाहिनी टाकावी लागली असती. हा खर्च किमान 1 कोटी रुपयांवर गेला असता. मात्र, सध्या सिडको आणि एमआयडीसीकडून जलवाहिन्या टाकण्याची कामे सुरू आहेत. गावाजवळून सिडकोची जलवाहिनी गेल्याने या जलवाहिनीद्वारे एमआयडीसीचे पाणी मिळवता येईल का, याची चाचपणी ग्रामपंचायतीने करून सिडकोचे प्रशासक केंद्रेकर यांच्याकडे तशी परवानगी मागितली. त्यावर केंद्रेकर यांनी शिक्कमोर्तबही केले. त्यामुळे ग्रामपंचायतीचा तब्बल 1कोटी रुपये खर्च वाचला.
योजनेचे पाणी गढूळ!
भारत निर्माण पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून गावात पाणीच येत नाही. मागील एका महिन्यापूर्वी पाणी आले होते, परंतु पाणी गढूळ असल्यामुळे ते पिण्यायोग्य नव्हते.
मदन काळे, रहिवासी
पाण्यात बेडूक आढळले
मागील वर्षी पाण्यामुळे आमचे खूप हाल झाले. या वर्षी भारत निर्माणचे पाणी मिळणार या आशेवर आम्ही होतो. परंतु त्याचेही काही खरे नाही. महिनाभरापासून पाणीही सोडले नाही. मागील वेळी सोडण्यात आले तेव्हा त्यात बेडूक निघाले. असे पाणी पिणार कसे?
सिद्धार्थ बनकर, फुलेनगर
पूर्वीचे घोटाळे लपवण्यासाठी खटाटोप
भारत निर्माण पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास नेण्यासाठी मी प्रयत्न केले आहेत. गेल्या 7 वर्षांपासून गावक-यांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. आजही गावातील काही भागांमध्येच पाणीपुरवठा होत आहे. जोपर्यंत योजनेचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांचे बिल क ाढायचे नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे कामाला गती मिळाली. सध्याचा विचार करता दुसरीकडून पाणी विकत घेण्याची गरज नाही, परंतु पूर्वीचे घोटाळे लवपण्याचा हा प्रयत्न असावा.
अनिल चोरडिया, जिल्हा परिषद सदस्य
वाढीव लोकसंख्येमुळे एमआयडीसीचे पाणी
मूळ गावाला पाणीपुरवठा करता येईल इतके पाणी भारत निर्माण योजनेअंतर्गत उपलब्ध आहे. गावात अनेक नवीन वसाहती निर्माण झाल्या. कामगारांचे वास्तव्य वाढल्यामुळे पाणीप्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने एमआयडीसीचे पाणी सिडकोच्या जलवाहिनीतून गावक-यांसाठी उपलब्ध क रून देण्याचा प्रयत्न केला आहे.
छाया बाळासाहेब कारले, सरपंच, वडगाव कोल्हाटी.
पंचायतीला पाणीपट्टी परवडणार नाही
त्या वेळी परिस्थितीनुसार भारत निर्माण पाणीपुरवठा योजनेची गरज होती. त्यामुळे ही योजना राबवण्यात आली. भविष्यात एमआयडीसीकडून पाणी उपलब्ध होणार याचे कुठलेच नियोजन नव्हते. आज ग्रामपंचायत जरी एमआयडीसीचे पाणी विकत घेऊन गावाला देणार असली तरी पाणीपट्टीच्या दराचा विचार केल्यास त्यांना ते परवडणारे नाही.
आर. जे. कोयलवर , उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, औरंगाबाद
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.