आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडकोकडे जमा रकमेतून करावा वॉर्डांचा विकास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सातारा-देवळाईतील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवाव्यात, दोन्ही वॉर्डांसाठी सिडकोकडे जमा झालेली रक्कम मनपाने घेऊन त्यातून वॉर्डांचा विकास करावा, अशी मागणी आमदार सुभाष झांबड यांनी मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे सोमवारी निवेदनाद्वारे केली.
बांधकाम परवाने द्यावेत. शहरातील रस्ते व्हाइट टॉपिंगचे करावेत, कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी बायो प्रोजेक्ट राबवावा. भूमिगत गटार योजनेचे त्याच जागी जलशुद्धीकरण युनिट उभारावे, आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. या वेळी आमदार सुभाष झांबड, काँग्रेसचे शहराध्यक्ष नामदेव पवार, नगरसेवक तथा काँग्रेसचे गटनेते भाऊसाहेब जगताप, अयुब खान, सोहेल शेख, नवीद अब्दुल, अश्फाक कुरेशी आदींची उपस्थिती होती.

मालमत्ता नियमित करा
सातारा-देवळाईतील नागरिकांनीही मनपा आयुक्तांची भेट घेऊन मालमत्ता नियमित करण्याची मागणी केली. ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे, शासनाच्या निर्णयानुसार ग्रामपंचायतीच्या परवानगीचे बांधकाम नियमित करून घ्यावे. विकास शुल्क आणि करातून मिळणाऱ्या निधीतून नागरी सुविधा द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...