आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तम लँडस्केपिंगविना हुकला विमानतळाचा क्रमांक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवलेल्या चिकलठाणा विमानतळावर शंभर कोटी रुपये खर्च करण्यात आले. परिसरातील सोयी, सुविधा विलोभनीय बाग पाहून पर्यटक खुश होतात. परंतु मुख्य दरवाजाबाहेर पडताच त्यांची घोर निराशा होते, हे शब्द आहेत देशभरातील विमानतळांचे लेखा परीक्षण करणाऱ्या पथकाचे. केवळ विमानतळाबाहेर चांगले लॅडस्केपिंग नसल्याने चिकलठाणा विमानतळाचा राष्ट्रीय स्पर्धेतील प्रथम क्रमांक काही गुणांनी हुकला आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असल्याचे विमानतळ प्राधिकरणाचे मत आहे.
देशभरात १२५ विमानतळ आहेत. सर्वाधिक प्रवासी ये- जा असलेल्या वीस विमानतळांनाच केआरए (की रिझल्ट एरिया) लागू आहे. तो केआरए क्यू वन ते क्यू फोर श्रेणीत असतो. त्यासाठी एअरपोर्ट कार्पाेरेट प्लॅनिंग अॅड मॅनेजमेंट सर्व्हिसेसतर्फे दर तीन महिन्याला एकदा असे वर्षातून चार वेळा ऑडीट होते. त्याचा अहवाल चेअरमन सुधीर रहेजा यांना पाठवला जातो.

यंदा १५ मार्च रोजी ऑडिटसाठी पथक आले होते. गेल्या पाच वर्षात १०० कोटींपेक्षा अधिक रक्कम खर्च झाल्याने चिकलठाणा विमानतळावर नव्या सोयी-सुविधा निर्माण झाल्या आहेत. वाराणसी येथून आलेले विमानतळ संचालक आलोक वार्ष्णेय यांनी पुढाकार घेत विमानतळाच्या आतील ५०० एकरचा परिसर सुशाेभित केला. प्रवेशद्वारासमोर उत्कृष्ट उद्यान तयार केले. कर्मचाऱ्यांमध्ये नीटनेटकेपणा, टापटीप आणि कामाची शिस्त आणली. त्यामुळे विमानतळाचा पहिला क्रमांक येईल, अशी त्यांना अपेक्षा होती.

पथक खुश मात्र बाहेर पडताच शून्यचा शेरा
१५ मार्च पथकाने विमानतळाच्या आतील व्यवस्था पाहून आनंद व्यक्त केला. मात्र, मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंची झाडी, घाणीचे साम्राज्य पाहून शुन्य गूण दिले. यामुळे पहिला क्रमांक मिळवणाऱ्या रायपूरला ४. ८५ तर चिकलठाणा विमानतळाला ४.५४ गुण मिळाले.

पाठपुरावा करूनही प्रतिसाद नाही
सुशोभीकरण प्रवाशांची गर्दी या मुद्यांवर चिकलठाणा विमानतळ अंतिम आठ जणांच्या यादीत पहिला क्रमांक घेऊन पोहोचले. मात्र, पहिला क्रमांक पटकावण्यासाठी विमानतळाबाहेरील सुशोभीकरणही अत्यावश्यक असल्याचे वर्ष्णेव यांच्या लक्षात आले. त्यांनी सात ते आठ महिने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला. पण प्रतिसाद मिळाला नाही.

संधी हुकली
देशांतर्गत स्पर्धंत चिकलठाणा विमानतळ प्रथम क्रमांकाजवळ पोहचले होते. मात्र, प्रवेशद्वाराबाहेरील घाणीमुळे देशात प्रथम येण्याची संधी गेली. आता तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने चांगले काम करावे. आलोक वार्ष्णेय, विमानतळसंचालक

दिवसांत निविदा
काही तांत्रिक अडचणीमुळे सुशोभिकरण वेळेत करता आले नाही. आता मात्र, आठ दिवसात या कामाची निविदा काढून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे. यात दुतर्फा देखणे लॅडस्केपिंग करण्यात येणार आहे. अरविंद सूर्यवंशी, अधीक्षक अभियंता.
बातम्या आणखी आहेत...