आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - जायकवाडी धरणाला अतिरेक्यांपासून धोका निर्माण होण्याची शक्यता गतवर्षी गुप्तचर खात्याने व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर सीआयएसएफची (सेंट्रल इंडस्ट्रियल सेक्युरिटी फोर्स) सुरक्षा धरणाला पुरवण्यात यावी, असा प्रस्ताव आठ दिवसांत शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. ही माहिती जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संजय भर्गोदेव यांनी मंगळवारी दिली.
या भव्य प्रकल्पाला सांभाळण्यासाठी तोकडी सुरक्षा यंत्रणा आहे. सध्या केवळ दोन कॉन्स्टेबल या धरणाची सुरक्षा पाहत आहेत.
पथकाची पाहणी
भोपाळ, दिल्लीहून आलेल्या सीआयएसएफच्या पाच अधिकाºयांनी पाच महिन्यांपूर्वी 4 दिवस धरणाची तसेच जवळच्या गावांची पाहणी केली. नंतर गेल्या महिन्यात सुरक्षेबाबतचा अहवाल जायकवाडी पाटबंधारे विभागाला पाठवला.
21,750 चौ. किमी पाण्याची व्याप्ती
37.73
2909 दशलक्ष घनमीटर क्षमता
मीटर नदी पायापासून उंची
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.