आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Citizen Started School For Graduate Teacher In Zp School

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिक्षकासाठी भरवली जिल्हा परिषदेत ‘शाळा’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पाच वर्षांपासून पैठण तालुक्यातील वरवंडी तांडा येथील शाळेत पदवीधर शिक्षकाची नियुक्ती करावी, या मागणीसाठी या गावातील नागरिकांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेतच ‘शाळा’ भरवली.

वरवंडी तांडा जि. प. शाळेत 100 विद्यार्थी आहेत. तेथे पाच शिक्षक कार्यरत आहेत. मात्र, पदवीधर शिक्षक नसल्याने विद्यार्थी अभ्यासात कमी पडत असल्याची गावक-यांची तक्रार आहे. त्यामुळे पदवीधर शिक्षक नियुक्त करण्याची गावक-यांची मागणी आहे. या मागणीसाठी शुक्रवारी (23ऑगस्ट) सकाळीच नागरिकांनी विद्यार्थ्यांना गाडीत बसवून जिल्हा परिषद गाठले. शाळेतील परिपाठ येथेच घेण्यात आला. त्यानंतर विद्यार्थी दोन तास रांगेत बसून होती. मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या दौ-याच्या कामात असल्याने निवेदन कुणाला द्यावे, ही अडचण निर्माण झाली. त्यामुळे सकाळी 11.30 ते 2.30 या वेळेत विद्यार्थ्यांना शाळेतच बसावे लागले. दुपारी अडीच वाजता उपशिक्षणाधिकारी एन. के. देशमुख यांनी पालक व उपस्थितांना पदवीधर शिक्षकाची तत्काळ नियुक्ती करण्याचे आश्वासन दिल्याने पालकांनी आंदोलन मागे घेतले. या वेळी सरपंच अंसाबाई गोरख राठोड, विलास भुमरे, सुनीता राठोड आदी उपस्थित होते.