आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनतेचा जाहीरनामा: समांतर जलवाहिनी योजना मनपानेच राबवावी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या आठ वर्षांपासून केवळ चर्चेत असलेल्या समांतर जलवाहिनीच्या योजनेला अजूनही वेग आलेला नाही. पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे योजनेत भ्रष्टाचार झाला आहे. एकीकडे पाण्यासाठी टाहो फोडला जात असताना दुसरीकडे केवळ योजनेचे मुहूर्त जाहीर केले जात आहेत. हा सर्व प्रकार पाहता समांतरची योजना ठेकेदाराऐवजी मनपानेच राबवावी, असे ७३.६८ टक्के लोकांनी ठणकावून सांगितले आहे. पुढील पाच वर्षे मनपाची सत्ता चालवणाऱ्यांनी हा निर्णय घ्यावा, असे त्यांनी जनतेच्या जाहीरनाम्यात स्पष्ट केले आहे.

निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध होतात. मात्र, त्यात लोकांना काय वाटते, त्यांना कोणत्या समस्या महत्त्वाच्या वाटतात. शहरातील महत्त्वाच्या योजनांबद्दल त्यांना काय वाटते, हे राजकारण्यांकडून जाणून घेतले जात नाही. म्हणूनच ‘दिव्य मराठी’ने जनतेचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला.

कशी होती प्रक्रिया
‘दिव्य मराठी’ने जनतेचा जाहीरनामा कसा असावा, यासाठी तज्ज्ञांकडून काही प्रश्न मागवले. ते प्रसिद्ध करण्यात आले. नागरिकांनी या प्रश्नांची उत्तरे भरून त्याची प्रत ‘दिव्य मराठी’ कार्यालयात आणून द्यावी किंवा व्हाॅट्सअॅपवर पाठवावी, ई-मेल करावा, असे आवाहन करण्यात आले.

नागरिकांच्या सोयीसाठी शहराच्या विविध भागात प्रती दाखल करण्याचीही सुविधा होती. त्यानुसार ५७० जणांनी प्रश्नांची उत्तरे देत त्यांचे मत नोंदवले. हे नागरिक शहराच्या सर्व भागांतील आणि सर्व स्तरांतील रहिवासी होते. प्रत्येक प्रश्नानुसार त्यांचे वर्गीकरण करून टक्केवारी निश्चित करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...