आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपेक्षा जनतेच्या : सोशल साइटवर मर्यादा आणा; सवलती जात नव्हे, गुणवत्तेवर द्या!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर "दिव्य मराठी'ने सुरू केलेल्या टॉक शोच्या उपक्रमात शनिवारी राज्याच्या युवा धोरणाबाबत तरुणाईच्या अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. धोरण राबवताना केंद्र-राज्य समन्वय असावा, असा सूर चर्चेतून निघाला. चांगले शिक्षण, पुरेशा रोजगाराच्या संधींचा विचार व्हावा. राजकारणात निवृत्ती वय ठरवून तरुणांना संधी द्यावी. सवलती जात पाहून नव्हे, तर गुणवत्तेवर देण्यात याव्यात, अशी मते व्यक्त झाली.
* युवा संशोधक घडवावेत. एक गाव एक उद्योग योजना हवी.
*शैक्षणिक कर्ज प्रक्रिया सुलभ असावी. व्याजदर कमी असावा.
*परदेशी िशक्षणाची सोय सुलभ व्हावी, पीजीला िवद्यावेतन द्यावे
*जात नव्हे, गुणवत्तेनुरूप सवलती देण्यात याव्यात.
*पुणे-मुंबईप्रमाणे िजल्हास्तरावर िशक्षण सुिवधांची निर्मिती.
*धोरण काॅलेजमार्फत राबवावे. खर्चाचे सोशल ऑिडट व्हावे.
*ग्रामीण तरुणांसाठी मािहती केंद्र
रोजगार निर्मितीवर भर हवा.
*िजल्हास्थानी विद्यार्थी वसतिगृहे.
शहरांत क्रीडा प्रबोधिनी हवी.
*धोरण सर्वसमावेशक होण्यासाठी धोरणात युवतींना स्थान मिळावे.
*क्रीडा विद्यापीठे निर्माण व्हावीत,
नोकऱ्यांत खेळाडूंना संधी द्यावी.
*योजना काॅलेजमार्फत राबवा. राज्यभराचा युवा महाेत्सव हवा.
*काॅलेजच्या निवडणुकांना स्थान, नेतृत्व िवकासाच्या संस्था हव्या.
*पुढाऱ्यांचे निवृत्ती वय ठरवून तरुणांना अधिक संधी द्यावी.
*राजकारणात घराणेशाही नको,
विद्यािर्थनीं नेतृत्वाला संधी द्या.
*कॅम्पस "वायफाय' व्हावा.
*सोशल नेटवर्कवर मर्यादा हवी. शिक्षणात मूल्य िशक्षण अंतर्भाव
*काैशल्यावर आधारित िशक्षण,
स्ट्रेस मॅनेजमेंटवर भर असावा
*अशिक्षित, अल्पशिक्षित व उच्च शिक्षित अशा गटांचे धोरण हवे.
*छोटे-व्यवसायाभिमुख कोर्सेस, शेती शिक्षणाला प्राधान्य द्यावे.
*अभ्यासक्रमात धोरणाचा समावेश. ग्रामसभेत चर्चा व्हावी.
*युवक प्रशिक्षण केंद्रांची योजना प्रत्येक जिल्ह्यात राबवली जावी.
*विदर्भासाठी स्वतंत्र धाेरण हवे.
स्थानिक िठकाणी ‘युवा संसद
*तरुण उद्योजक घडवण्यासाठी गाव, शहरांत कार्यशाळा व्हाव्या.
*केंद्रीय पद्धतीने नोकर भरती,
नोकरीत भूमिपुत्रांना प्राधान्य.
0७ िठकाणी एकाच वेळी झाली चर्चा
१५० हून अधिक आल्या सूचना
११४ मान्यवर चर्चेत सहभागी
िवद्यार्थी-िवद्यार्थनिी, संघटनांचे प्रतनिधिी, िवद्यापीठांचे अधिसभा सदस्य, प्राचार्य, युवक मंडळाचे प्रतनिधिी, िवद्यार्थी क्रीडापटू, अधिकारी, राजकीय नेत्यांचा समावेश.