आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खड्डे बुजवण्यासाठी सुटीच्या दिवशीही शहरवासीय सरसावले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील जीवघेण्या खड्ड्यांवर डीबी स्टारने वृत्त प्रसिद्ध करून मनपा यंत्रणेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. आता शहरवासीयांनी स्वत:च पुढाकार घेऊन हे खड्डे बुजवावे, असे आवाहनही केले. ज्या दिवशी बातमी प्रसिद्ध झाली त्याच दिवशी लोक कामाला लागले. आता तर रविवारी सुटीच्या दिवशीही लोक या कामासाठी पुढाकार घेत आहेत. आज अंजली सिनेमा ते निराला बाजार-कोहिनूर प्लाझा या दीड किमी अंतराच्या रस्त्यावरील सर्व खड्डे काही तासांतच शास्त्रशुद्ध पद्धतीने बुजवले. यासाठी शहरातील काही ज्येष्ठ वास्तुविशारदांनी पुढाकार घेतला. त्यांना ‘साथी हात बढाना’ म्हणत राजस्थानी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी टोपले-फावडे घेत मदत केली.
दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करून जनतेचा हा पैसा पाण्यात घातला जातो. खाबूगिरीची कीड लागल्याने वर्षानुवर्षे खराब रस्ते अन् खड्डे शहरवासीयांच्या पाचवीलाच पूजलेले आहेत. यावरच डीबी स्टारने २० ऑगस्ट रोजी ‘हे आहेत शहरातील दहा ‘उत्कृष्ट’ खड्डे’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून लोकांनाच आवाहन केले. हे वृत्त प्रसिद्ध झाले त्याच दिवशी अनेकांनी आम्ही खड्डे बुजवू म्हणत काम करण्याची तयारी दर्शवली. एवढेच नव्हे तर काहींनी काम सुरू केले.

आम्ही केव्हाही मदतीला तयार
सारडायांच्यास्तुत्य उपक्रमाला आमच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सातत्याने साथ देण्याचे कबूल केले आहे. त्यामुळे आम्ही दर रविवारी मदत करणार. अशोक घोडपकर, व्यवस्थापक,राजस्थानी वसतिगृह.

सर्व खड्डे बुजवण्याचा प्रयत्न
डीबीस्टारनेप्रसिद्ध केलेल्या सर्वच मार्गांवरील खड्डे बुजवण्याचा प्रयत्न राहील. दर रविवारी रस्त्यांची निवड करून हे काम करणार आहोत. अशोक मतसागर

प्रत्येक रविवारी अभियान
या रस्त्यावर आदल्या दिवशी अपघात पाहिला आणि दुसऱ्या दिवशी डीबी स्टारचे वृत्त वाचले. त्यातून प्रेरणा मिळाली. दर रविवारी हे अभियान सुरू ठेवू. -दिलीप सारडा
बातम्या आणखी आहेत...