आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागरिकांकडून खड्डे बुजवण्यास सुरुवात,स्वत:ची मदत करायला शहरवासीय सरसावले...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्चून रस्ते केले जातात, पण खाबूगिरी अन् निकृष्ट कामामुळे त्यांची वाताहत होते. मुख्य असो की अंतर्गत.. साऱ्याच रस्त्यांची ही अवस्था आहे. वर्षानुवर्षे ही परिस्थिती. थातूरमातूर काम करायचे, पुन्हा दुसऱ्या वर्षीची सोय करून ठेवायची. हे दुष्टचक्र कायम सुरू असते. अतिच झाल्याने डीबी स्टारने साऱ्या शहरभर फिरून खड्डे निवडले आणि २० ऑगस्ट रोजी ‘हे आहेत शहरातील दहा ‘उत्कृष्ट’ खड्डे’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर अनेक नागरिकांनी खड्डे बुजवण्यासाठी पुढाकार घेतला.
राहुल इंगळे मित्रमंडळ
सिडकोबसस्थानकासमोरील जोड रस्त्यावर असलेले सर्व खड्डे राहुल इंगळे मित्रमंडळाने आजपासून बुजवायला सुरुवात केली. मित्रमंडळाच्या इंगळे यांच्यासह अक्षय गोयल, जगन जोशी, अक्षय शिंदे, अक्षय ताठे, सागर पुरी आणि ज्येष्ठ नागरिक प्रवीण कटारिया यांनी स्वत: रस्त्यावर उतरून कामाला सुरुवात केली.
शहरातील जीवघेणे खड्डे बुजवण्यासाठी आता नागरिक स्वत: सरसावले आहेत. डीबी स्टारने दहा ‘उत्कृष्ट’ खड्ड्यांचे वृत्त प्रसिद्ध केले. सोबतच शहरवासीयांनी स्वत:च तात्पुरते खड्डे बुजवून आपला त्रास दूर करावा, असे आवाहनही या वृत्तातून केले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आता अनेक शहरवासीय पुढे आले आहेत. व्यक्ती, संस्था आणि संघटनांनी हे खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे. दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागही कामाला लागला आहे. निदान हे पाहून तरी मनपा जागी होईल, अशी अपेक्षा आहे.

‘कॉलटी’चाही कॉल
‘कॉलटी’ च्या सुनील वाघ यांनीही आपल्या चहाच्या पैशांतून एक रस्ता खड्डेमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. चिश्तिया चौक ते प्रोझोन माल या रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवणार असल्याचे ते म्हणाले. आठ दिवसांत ट्रॅक्टर, मुरूम आणि फावडे आदी साहित्य जमवू आणि त्यानंतर आम्ही हे काम सुरू करू, असेही ते म्हणाले.

काबरा यांचाही पुढाकार
ज्योतीनगरमधील चौकातील खड्डे दोन दिवसांत बुजवणार. येत्या दोनच दिवसांत या सर्व खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून हा सर्व रस्ता चांगला करणार असल्याचे काबरा कन्स्ट्रक्शनचे शैलेश काबरा यांनी सांगितले. दरम्यान शिवनेरी मित्रमंडळाच्या छबू आगलावे यांनीही एका रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचा निर्धार केला आहे.

सा.बां.विभाग झाला जागा
वृत्तप्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम खात्याने मस्कट कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत क्रांती चौक ते विमानतळ, सिडको टी पॉइंट ते हर्सूल टी पॉइंट या दोन रस्त्यांची भूमर मशीनने झाडलोट केली. गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावर साचलेली खडी धूळ साफ केली. त्यानंतर डांबर टाकून खड्डे बुजवायला प्रारंभ केला.

इंगळे मित्रमंडळाने सिडको बसस्थानकासमोरील जोड रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांत मुरूम टाकून ते बुजवले. त्यामुळे तात्पुरता का होईना येथे ये-जा करणाऱ्या सर्व बसेसचा मार्ग सुकर झाला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरची माती काढून खड्डे बुजवायला प्रारंभ केला.
डीबी स्टारविषयी तुमच्या सूचना, प्रतिक्रिया असल्यास आम्हाला editor.dbstar@dbcorp.in या ई-मेलवर किंवा ९०४९०६७८८८ या मोबाइलवर संपर्क (फक्त सएमएस ) करू शकता.

मीही पुढाकार घेणार
रोज ज्याखड्ड्यांमुळे त्रास होतो ते ज्योतीनगरमधील चौकातील खड्डे बुजवण्याचा निर्णय मी घेतला आहे. डीबी स्टारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मी हे काम करणार आहे. शैलेश काबरा, काबराकन्स्ट्रक्शन

सकाळपासूनच काम सुरू
क्रांती चौक ते विमानतळ, सिडको टी पॉइंट ते हर्सूल टी पॉइंट या दोन रस्त्यांची सफाई केली. भूमर मशीनने झाडलोट करून खडी धूळ साफ केली. आता त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम आम्ही सकाळपासूनच सुरू केले. आता या रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही, याची हमी देतो. ख्वाजाअमीन, मस्कटकन्स्ट्रक्शन

आम्ही पुढाकार घेतोय
शहरातजिकडे-तिकडेफक्त खड्डेच दिसतात. एकही रस्ता असा नाही ज्यावर खड्डे नाहीत. डीबी स्टारच्या वृत्तानंतर आम्ही आमच्या परीने या दुरुस्ती कामात पुढाकार घेत आहोत. जेवढे जमेल तेवढे खड्डे बुजवणार आहोत. राहुल इंगळे

एक रस्ता खड्डेमुक्त करणार
गेल्याअनेकदिवसांपासून या खड्ड्यांसाठी आपण काहीतरी करावे असे वाटत होते, पण नेमके काय करावे हे सुचत नव्हते. डीबी स्टारचे वृत्त वाचले आणि मला बळ मिळाले. चहा विक्रीच्या पैशांतून मी हे काम करणार आहे. अन्य कुणाला या कामात सहभागी व्हायचे असेल त्यांनी यावे. स्वागतच केले जाईल. -सुनीलशंकर वाघ, कॉलटी
बातम्या आणखी आहेत...