आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरवासीयांना ई-मेलद्वारे नोंदवता येईल ध्वनिप्रदूषणाची तक्रार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डीजेचा दणदणाट किंवा अन्य वाद्यांच्या गोंगाटाने त्रस्त झालेल्या नागरिकांना आता तक्रार नोंदवण्यासाठी पोलिसांकडे जावे लागणार नाही. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती यांच्या पुढाकारामुळे आता घरबसल्या ई-मेलद्वारे तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापूर्वी अशा तक्रारींसाठी फक्त १०० क्रमांक उपलब्ध होता. तक्रार करताना तक्रारदारास नाव, पत्ता नोंदवावा लागत असे. मात्र, त्यानंतर लागणारा पोलिसांचा ससेमिरा पाहता कटकट नको म्हणत नागरिक तक्रार नोंदवण्यास अनुत्सुक असायचे. त्यावर पोलिस आयुक्तांशी चर्चा करून वेबसाइट (www.aurangabadcitypolice.com) तयार करण्यात आली आहे. तसेच विभागनिहाय अधिकाऱ्यांचे ई-मेल आयडी तयार करण्यात आले असून आता १०० या क्रमांकासह शहरातील २२ पोलिस अधिकाऱ्यांच्या ई-मेलवर थेट तक्रार करता येणार आहे.
२३ पोलिस ठाण्यांतील अधिकाऱ्यांचे ई-मेल पुढीलप्रमाणे
डीसीपीझोन : dcpzone1.abad@mahapolice.gov.in
डीसीपीझोन : dcpzone2.abad@mahapolice.gov.in
एसीपीक्राइम : acpcrime.abd@mahapolice.gov.in
एसीपी(स्पेशलब्रँच) : acpwisha.abad@mahapolice.gov.in
एसीपी(कंट्रोल रूम) : acpcr.abad@mahapolice.gov.in
एसीपी(सिटी) : acpcity.abad@mahapolice.gov.in
एसीपी(कँटोनमेंट) : acpcantt.abad@mahapolice.gov.in
एसीपी(सिडको): acpcidco.abad@mahapolice.gov.in
एसीपी(ट्रॅफिक): acptraff.abad@mahapolice.gov.in
सिटीचौक : ps.citychowk.abad@mahapolice.gov.in
क्रांतीचौक : ps.krantichowk.abad@mahapolice.gov.in
सिडको: ps.cidco.abad@mahapolice.gov.in
एमआयडीसीसिडको : ps.mcidco.abad@mahapolice.gov.in
जवाहरनगर: ps.jnagar.abad@mahapolice.gov.in
मुकुंदवाडी: ps.mwadi.abad@mahapolice.gov.in
छावणी: ps.cantt.abad@mahapolice.gov.in
बेगमपुरा: ps.gegumpura.abad@mahapolice.gov.in
वाळूज: ps.waluj.abad@mahapolice.gov.in
एमआयडीसीवाळूज : ps.mwaluj.abad@mahapolice.gov.in
जिन्सी: ps.jinsi.abad@mahapolice.gov.in
उस्मानपुरा: ps.osmanpura.abad@mahapolice.gov.in
क्राइमब्रँच : ps.crimebranch.abad@mahapolice.gov.in
बातम्या आणखी आहेत...