आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे,मुंबईप्रमाणे औरंगाबादेतही हवी महिलांसाठी शहर बससेवा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील विद्यार्थिनी, प्रवासी, पर्यटक, कामगार, नोकरदार महिलांना सुरक्षित प्रवासाची सोय व्हावी यासाठी राज्य सरकारने मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे आणि नागपूर या शहरांमध्ये केवळ महिलांसाठी ३०० तेजस्विनी बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर औरंगाबादेतही महिलांसाठी स्वतंत्र बससेवा सुरू करण्याची आवश्यकता आहे.
औरंगाबादमध्ये सध्या एसटी महामंडळ सिटी बस चालवते. १५ लाखांवर लोकसंख्या असलेल्या शहरात केवळ ४६ सिटी बस धावतात. लोकसंख्येच्या तुलनेत या बस अपुऱ्या आहेत. शिवाय विद्यार्थिनी, कामगार, नोकरदार, पर्यटक महिलांना धक्के खात प्रवास करावा लागतो. स्वतंत्र आसन व्यवस्था असलेल्या हक्काच्या जागेवर महिलांना बसू दिले जात नाही, गर्दीत छेडछाड केली जाते. वेळेवर सुरक्षित प्रवासाची हमी नसल्याने प्रवासी खासगी सेवेकडे वळले आहेत. परिणामी शहरात रिक्षांचे प्रमाण २५ हजारांवर गेले आहे. शाळा, कॉलेजसाठी रिक्षांना प्राधान्य दिले जाते. पण या सेवेतही सुरक्षेची हमी नाही. रिक्षाचालकांनी विद्यार्थिनींवर केलेल्या अत्याचाराच्या काही घटनांमुळे पालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. तरीही सुरक्षेच्या दृष्टीने शाश्वत उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. स्मार्ट सिटीत औरंगाबादचा समावेश झाल्यामुळे आता स्मार्ट प्रवास सेवाही असायला हवी. स्पेशल पर्पज व्हेइकलच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात १०० बस सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र, महिलांसाठी स्वतंत्र बससेवेचा त्यात कुठेही उल्लेख नाही. राज्य शासनाच्या तेजस्विनी योजनेअंतर्गत ठाणे, मुंबई, पुणे आणि नागपूर शहरात लेडीज स्पेशल बससेवा सुरू करण्यात येत आहे. यासाठी राज्य सरकार महापालिका प्रशासनाने ५०-५० टक्के खर्चाची तरतूद केली आहे. त्याच धर्तीवर एसटी महामंडळ औरंगाबाद महापालिकेने पुढाकार घेऊन तेजस्विनी बससेवा सुरू करणे आवश्यक आहे.

निर्णय घेतला जाईल
ठाणे,मुंबई, पुणे, नागपूर येथे तेजस्विनी योजनेअंतर्गत महिलांसाठी बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबादेतही ही सेवा सुरू करता येईल. यासाठी बैठकीत सर्वानुमते निर्णय घेतला जाईल, असे विभाग नियंत्रक आर. एन. पाटील म्हणाले.

४६ सिटीबस धावतात
^सरकारची तेजस्विनी योजना काय आहे, हे प्रथम मी जाणून घेतो. त्यानंतर महिलांसाठी स्वतंत्र बससेवा सुरू करण्यासाठी सर्वानुमते निर्णय घेतला जाईल. -त्र्यंबक तुपे, महापौर

^समाजाने महिलांनापुरुषांच्या बरोबरीचा दर्जा देणे अपेक्षित आहे. पण केवळ संरक्षण देण्याच्या उद्देशाने स्वतंत्र बससेवा देणे हा दुजाभाव वाटतो. -गीता म्हस्के, राष्ट्रीय नेमबाज

^पर्यटन राजधानीतमहिलांसाठी तेजस्विनी बससेवा विनाविलंब सुरू करावी, यासाठी मनपा आयुक्त, परिवहनमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी करणार आहे. -शालिनीबुंधे, महिला कार्यकर्त्या

रेल्वेस्टेशन, बसस्थानक, पर्यटन स्थळे, विद्यापीठ, बाजारपेठ, औद्योगिक वसाहत, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स, धार्मिक स्थळे, उच्च शिक्षण संस्था, शासकीय कार्यालये अशा काही महत्त्वाच्या मार्गांवर स्वतंत्र बससेवेला चांगला प्रतिसाद मिळेल.
बातम्या आणखी आहेत...