आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केवळ आठ महिन्यांत शहरातील रस्त्यांवर धावतील अद्ययावत बस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - स्मार्टसिटी प्रकल्पांत दृश्य स्वरूपातील कामांना प्राधान्य देण्यात आले असून येत्या ते महिन्यांत शहरातील रस्त्यांवर बसेस धावल्याच पाहिजे, यासाठी आग्रह धरण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एसपीव्हीपीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
केंद्र शासनाने मागील महिन्यातच औरंगाबाद शहराची स्मार्ट सिटीसाठी निवड केली. त्यासाठी केंद्राकडूनच एसपीव्हीची स्थापना करण्यात आली. एसपीव्हीचे संचालक तथा मेंटॉर अपूर्व चंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी बैठक घेण्याचे ठरले होते. ऐनवेळी चंद्रा बैठकीस हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी पी.एल.सोरमारे, मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड, सभापती मोहन मेघावाले, विरोधी पक्षनेते अय्यूब जहागीरदार, काँग्रेसचे गटनेते भाऊसाहेब जगताप, फोट्रेस कंपनीचे अजय भोरे उपस्थित होते.

पीपीपीचा पर्याय निवडला : शहरबस सुरू करण्यासाठी एसपीव्हीसमोर एसटी महामंडळ पीपीपी असे दोन पर्याय होते. परंतु महामंडळाची वस्था तसेच प्रक्रिया पूर्ण होण्यास विलंब लागण्याची शक्यता लक्षात घेऊन पीपीपी तत्वावर शहर बस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी इच्छुकांकडून प्रस्ताव मागवण्याचे सूचवण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत ते १० महिन्यांत बस सुरू व्हायलाच हव्यात, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. बस सुरू करण्यापूर्वी शहरातील नफ्याचे अन तोट्याचे रस्ते निवडण्यात येतील. त्यानुसार बसची संख्या ठरवली जाईल.

तूर्तास बकोरिया सीईओ
स्मार्टसिटी मधील विविध विकास कामांच्या अंमलबजावणीसाठी ‘सीईओ’ची नेमणूक करण्यात येणार आहे. आयएएस दर्जाचा अधिकारी या पदावर असेल. अजून तशी नियुक्ती झाल्याने तूर्तास पालिका आयुक्त बकोरिया यांनीच सीईओचे काम पहावे, असाही निर्णय घेण्यात आला. सध्या बससेवेला प्राधान्य देण्यात येत असून ही सेवा आकर्षक असेल. बस थांबेही हायटेक असतील, असे बकोरिया यांनी सांगितले.

या कामांना प्राधान्य
सेफसिटी अंतर्गत शहरातील प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवायचे आहेत. याचा पोलिसांनाही फायदा होणार आहे. हे कामही तातडीने हाती घ्यायचे आहे. शहरातील प्रत्येक चौकाचे सुशोभीकरण करणे, प्रत्येक चौकात झेब्रा क्रॉसिंग असावे असाही निर्णय यावेळी घेण्यात आला. यासाठी खासगी उद्योजक समोर आले नाही तर स्मार्ट सिटीतून पैसे खर्च करून आयलँड विकसित करायचे आहेत.

केंद्र शासनाने स्मार्ट सिटी अंतर्गत विविध कामे करण्याची रेषा निश्चित केली आहे. एकूण ३८ सूचना केल्या असून त्याच दिशेने वाटचाल करायची आहे. स्मार्ट सिटीचे परिणाम काही दिवसांतच कसे दिसतील, तशी कामे तातडीने करायची आहेत. पॅन सिटीमध्ये जुन्या शहराला जास्तीत जास्त फायदा मिळेल अशा दोनच गोष्टी आहेत. त्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि घनकचरा या दोनच मुद्यांचा समावेश आहे. शहरात पीपीपी मॉडेलवर एसीपीव्ही अंतर्गत बसेस सुरू कराव्यात अशी मागणी आहे.
बातम्या आणखी आहेत...