आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीत शहर दिसणार सुंदर आणि स्वच्छ!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दिवाळी सणात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. त्यामुळे शहर सुंदर स्वच्छ राहण्यासाठी मनपाचे सफाई कामगार दिवळी सुट्यांतही काम करणार आहेत. सुटीच्या दिवशी काम केल्याचा तयांना त्याच महिन्यात मोबदलाही देण्याचा महत्त्वाचा निर्णयही मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी घेतला आहे. 
 
दिवाळीत अनेक वस्तूंची खरेदी, खाद्य पदार्थ तयार करणे, कपड्यांसह विविध बाबींच्या खरेदीनंतर त्याची वेष्टण फेकली जातात. फटाक्यांची आतषबाजीमुळे मोठ्या प्रमाणात घाण होते. त्यामुळे ऐन सणासुदीत रस्त्यांसह परिसर स्वच्छ राहण्यासाठी महानगरपालिकेच्या सर्व १६५६ सफाई कामगारांना नियमित काम करण्याची सूचना बकोरिया यांनी दिली. यापूर्वी वर्षानुवर्षे सुटीच्या दिवशी काम केल्याचा मोबदला मिळत नव्हता. या महिन्यांपासून मात्र नियमित वेतनात सुटीच्या दिवशीचा मोबदला देण्यात येणार आहे. तसेच कोणालाही सुटी मिळणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. 

मंगळवारी विशेष स्वच्छता मोहीम 
शहरातील संपूर्ण चौकांची स्वच्छता करण्यासाठी मनपातर्फे मंगळवारी सकाळी सहा ते दहा या वेळेत विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यात यात पीईएस, एसबी, एमआयटी, एमजीएम, मराठा हायस्कूल आदी महाविद्यालयातील एनसीसीच्या ६०० विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार आहे. मनपाच्या कर्मचाऱ्यांसोबतच हे विद्यार्थी स्वच्छता करतील. मनपा आयुक्तांसह महापौर अन्य पदाधिकारीही सहभागी होतील, असे घनकचरा व्यवस्थान प्रमुख शिवाजी झनझन यांनी सांगितले. 
 
बातम्या आणखी आहेत...