आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतिहास जपण्यासाठी ‘सिटी वॉक’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहराला चारशे वर्षांचा इतिहास आहे आणि शहराच्या कानाकोपर्‍यात ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष विखुरले आहेत, हे किती लोकांना ठाऊक आहे? अनेक दुर्मिळ आणि ऐतिहासिक वास्तूंमागे रंजक माहिती दडली आहे आणि ती औरंगाबादकरांना देण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने ‘सिटी वॉक’ उपक्रम हाती घेतला आहे. रविवारी (नऊ फेब्रुवारी) सकाळी नऊ वाजता भडकल गेट येथे हा उपक्रम सुरू होईल.
रामदेवराय यादवांच्या काळात एका अतिशय छोटेखानी गावाच्या (खडकी) रूपात असलेल्या या शहराचे रूप निझामशाहीचा सरदार मलिक अंबरने पालटले.

घाटीकडे
भडकलगेट
सांस्कृतिक मंडळाकडे
पोलिस आयुक्तालय
मिलकॉर्नर
मध्यवर्ती बसस्थानक

भडकल गेटपासून सुरुवात
नऊ फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजता भडकल गेट येथून या उपक्रमाची सुरुवात होणार आहे. तेथून टाऊन हॉल, जामा मशीद, नौबत दरवाजा, काळा दरवाजा, रंगीन दरवाजा अशी ही अनोखी सफर राहणार आहे. प्रख्यात इतिहास संशोधक प्रा. दुलारी कुरेशी आणि आर्किटेक्ट अजय कुलकर्णी या दरवाजांची माहिती देणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पर्यटनशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. राजेश रगडे, टुरिस्ट गिल्डचे अध्यक्ष जसवंतसिंग यांचीही उपस्थिती राहणार आहे.

असे व्हा सहभागी
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. थोडेसे पायी चालण्याची तयारी असलेले कोणत्याही वयोगटातील नागरिक, विद्यार्थी त्यात सहभागी होऊ शकतात. तज्ज्ञांकडून दिली जाणारी टिपणे घेण्यासाठी डायरी, पेन आणले तरी पुरेसे आहे.