आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांवर कंपनीसह मनपानेही केला दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहराला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी औरंगाबाद सिटी वॉटर युटीलीटी कंपनीने मनपाचे २३४ कर्मचारी घेतले होते. त्यांना मनपाने पुन्हा आपल्या सेवेत घेतले आहे. मात्र जे १२४ कर्मचारी कंपनीने खासगी संस्थेकडून घेतले होते, त्यांच्यावर आता मनपा आणि कंपनीकडून दावा करण्यात येत आहे. मात्र, यापैकी लाइनमनसह जे महत्वाचे कर्मचारी आहेत, त्यांचे वेतन कंपनीने पीएफसहीत दिले आहे. मात्र मनपाकडून यांना वेतन देण्यासाठी यादी तयार करण्याचे काम सुरू आहे.
शहराला पाणीपुरवठा करण्याचे काम खासगी कंपनीकडून काढून मनपाने स्वत:च्या ताब्यात घेतले आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सद्या कर्मचाऱ्यांवरून मनपा आणि कंपनीत अंतर्गत वाद सुरू आहे. मनपाने त्यांचे २३४ कर्मचारी परत घेतले आहेत. मात्र यात महत्वाची भूमिका बजावणारे तांत्रिक आणि लाइनमन, वॉलमन अशा १२४ कर्मचाऱ्यांना कंपनीने नियुक्ती दिलेली आहे. त्यांना कंपनीकडून वेतन देण्यात आले असून दिवाळी बोनसही कंपनीने दिला आहे. दुसरीकडे ऑक्टोबर महिन्याचे वेतन देण्यासाठी मनपाने यादी तयार करण्याचे कामे हाती घेतले आहे. अद्यापही हे कर्मचारी कंपनीच्या हजेरी रजिस्टरवर स्वाक्षरी करत आहेत. त्यांना पीएफही देण्यात येत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

^नगरसेवकांच्या तक्रारीआल्यानंतर तत्काळ सोडवतो, सामान्यांच्याही सोडवतो. १२४ कर्मचारी आमचे असून त्यांना ऑक्टोबर महिन्याचे वेतन देण्यासाठी त्यांची यादी मागवली आहे. सरताजसिंगचहल, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा

^ज्या संस्थेकडूनआम्ही लाइनमनसह टेक्निकलचे १२४ कर्मचारी कामावर नियुक्त केले, त्यांचे पीएफपासून वेतन, बोनस आम्ही दिले आहेत. त्यांचे वेतनही एक, दोन दिवसात देणार आहोत. अविकबिस्वास, मार्केटिंग, युटिलिटी

तक्रारी सोडवतो वेतन काढत आहोत
{मनपाला युटिलिटी कंपनीकडील १२४ फिल्डवरचे काम करणारे कर्मचारी हवे आहेत. मात्र या कर्मचाऱ्यांना आम्ही दिवाळी बोनससह वेतनही देत असून आमच्याकडे हे कर्मचारी स्वाक्षरी करत आहोत.
{मनपाने१२४ कर्मचाऱ्यांना मनपाचे नियुक्तीपत्र दिलेले नाही. दोन दिवसांपूर्वी या कर्मचाऱ्यांपैकी २३ कर्मचाऱ्यांना वेतन दिले आहेत. उर्वरित पैकी काही सुटीवर असून काहींना वेतन देण्याचे काम सुरू आहे.
{त्यामुळेते अद्याप आमचेच कर्मचारी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. दुसरीकडे, मनपानेही या कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याचे वेतन देण्याची तयारी दर्शवली आहे.
बातम्या आणखी आहेत...