आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समांतर कार्यालयाचे कुलूप अखेर काढले, आयुक्त ओमप्रकाश बकोरियांनी घातले लक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भाजपने नऊ दिवसांपूर्वी लावलेले कुलूप नंतर कंपनीने भाजपच्या आरोपांना उत्तर देत नाही तोपर्यंत कुलूप उघडणार नाही अशी घेतलेली भूमिका यात महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी लक्ष घालत आज समांतरला कार्यालय उघडायला लावले त्यामुळे आतापर्यंत बंद असलेली २४ तास काॅल सेंटर सुविधा तत्काळ पूर्ववत सुरू झाली.

नगरसेविकेला असभ्य वागणूक केल्याच्या कारणावरून तसेच आपल्या नगरसेवकांच्या वाॅर्डांत कामेच होत नसल्याचा आरोप करीत भाजपने दिवसांपूर्वी समांतरच्या कार्यालयाला टाळे ठोकले होते. त्यानंतर समांतरचे प्रकल्पप्रमुख तारीक खान यांना उपमहापौरांच्या कार्यालयात बोलावून सुनावलेे. यानंतर समांतरने एक पत्रक काढत भाजपच्या आरोपांना उत्तरे देईपर्यंत आम्ही हे कुलूप उघडणार नाही वाॅर्ड कार्यालयांतून काम करू असे सांगत तिढा सोडवण्याऐवजी तसाच लटकला होता. परिणामी समांतरचे २४ तास उपलब्ध असणारे काॅल सेंटर त्याच कार्यालयात असल्याने तेही बंद ठेवावे लागले.
कॉल सेंटरही पूर्ववत सुरू
पाण्याबाबतनागरिकांना तक्रार करायला जागाच उरली नाही. अखेर याबाबत मनपा आयुक्तांनी पुढाकार घेत भाजपच्या नेत्यांशी चर्चा केली त्यांचे प्रश्न ऐकून घेत ते सोडवण्यासाठी मी कंपनीला भाग पाडेन, असे आश्वासन दिले नागरिकांच्या सोयीसाठी कार्यालयाचे कुलूप उघडावे लागेल असे सांगितले. याला सहमती दिल्यावर आयुक्तांनी समांतरच्या अधिकाऱ्यांना समजावणीचे शब्द ऐकवले. त्यानंतर आज समांतरच्या मुख्यालयाचे कुलूप उघडण्यात आले. आता तेथील काॅल सेंटरही पूर्ववत सुरू झाले आहे.
बातम्या आणखी आहेत...