आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीच्या तारखेनुसार शालेय परीक्षांचे वेळापत्रक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरात महापालिका निवडणुकीचे वारे वाहत आहे. मात्र, निवडणुकीची तारीख अद्याप ठरलेली नाही. या तारखेवरच शालेय परीक्षांचे वेळापत्रक ठरवले जाणार आहे.विधानसभेप्रमाणे मनपा निवडणुकीतही शिक्षकांना काम करावे लागणार असून त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होण्याची चिन्हे आहेत. महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक एप्रिलमध्ये होईल, अशी चर्चा आहे.
यासाठी मतदान केंद्रे म्हणून शहरातील हजारावर मनपा आणि खासगी शाळांची गरज भासणार आहे . मनपाच्या ५७, जिल्हा परिषदेच्या ४, खासगी ७५० शाळा आहेत. यापैकी मनपा, जि.प. च्या सर्व शाळांसह खासगी शाळांमध्येही मतदान केंद्रे राहणार आहेत.
निवडणुकीसाठी सात हजार कर्मचाऱ्यांची गरज लागणार आहे. यासाठी खासगी तसेच शासकीय शिक्षकांना बोलावण्यात येते. परीक्षेपूर्वी निवडणूक जाहीर झाल्यास शिक्षकांची तारांबळ उडणार आहे, तर यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होईल.

तारीख आल्यावर पाहू
निवडणुकीची तारीख जाहीर झालेली नाही. त्यामुळे परीक्षांसंदर्भात कोणतेही नियोजन नाही; परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही.
ब्रिजेश जाधव, मनपा उपायुक्त.
वेळापत्रक व्यवस्थित
निवडणूक शहरातच असल्याने जिल्ह्यातील शाळांवर त्याचा परिणाम होणार नाही. त्यांचे वेळापत्रक व्यवस्थित आहे. शहरातील शाळांतील नियोजन मतदानाचे वेळापत्रक आल्यावर ठरेल. एम. के. देशमुख, शिक्षणाधिकारी.
गुरुजींसह विद्यार्थ्यांची दैना
विधानसभेच्या निवडणुकांमध्ये खासगी शाळांच्या शिक्षकांना निवडणुकीचे काम दिले होते. मनपाच्या निवडणुकीतही हे काम येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षकांवरील कामाचा ताण वाढतो आणि विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होतो. उज्ज्वला निकाळजे-जाधव, शिक्षिका
बातम्या आणखी आहेत...