आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भजनावरून दोन गटात हाणामारी, धुनकवाड गावातील प्रकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धारूर- भजन म्हणण्याच्या कारणावरून दोन भजनी मंडळात हाणामारी झाल्याची घटना बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील धुनकवाड येथील सावता माळी मंदिरात गुरूवारी रात्री नऊ वाजता घडली. 

 धारूर तालुक्यातील धुनकवाड हे दोन हजार लोकसंख्येचे गाव आहे. गाव पुर्वीपासून भजन, कीर्तनात अग्रेसर आहे. गावाच्या उत्तरेस सावता माळी महाराजांचे मंदिर असुन या मंदिरात सावतामाळी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त भजनाचे कार्यक्रम घेण्यात येतात. गुरुवारी रात्री भजनाचा कार्यक्रम होणार होता.
 
गावात श्रीराम महाराज यादव यांचे एक भजनी मंडळ आहे तर दुसरे सार्वजनिक भजनी मंडळ आहे. दोन्ही भजनी मंडळाने कार्यक्रम घेण्याचे नियोजन केले होते. श्रीराम महाराज यादव यांनी मंदिरात भजनाचे साहित्य जमा करून तयारी सुरू केली होती. एवढयात दुसरे सार्वजनिक भजनी मंडळ तेथे हजर झाले. या मंदिरात कोणत्या मंडळाने भजन करायचे याच्या वादावादीतून एका मंडळाने दुसऱ्या मंडळाचे टाळ, मृदंग,विणा, माईक फेकून दिल्याचा प्रकार घडताच दोन मंडळातील गटात जोरदार मारामारी झाली. या मारामारीचा वाद पोलिस ठाण्यापर्यंत पोहचला होता. परंतु नंतर आपसातील सामंजस्यामुळे हा वाद मिटला.
बातम्या आणखी आहेत...