आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Clashes Between Tow Professor In Milind Science College Aurangabad

प्राचार्यांच्या दालनात प्राध्यापकांत ‘फ्रीस्टाइल’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मिलिंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. एल. जगताप यांच्या दालनात शनिवारी (31 ऑगस्ट) दोन प्राध्यापकांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी झाली. हाणामारीत प्रा. कमलाकर इंगळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. मिलिंद मगरे आणि सुनील मगरे यांच्यासह पाच जणांच्या विरोधात छावणी पोलिसांत मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

प्रा. इंगळे यांच्याकडे प्राचार्यांनी मागील महिनाभरापासून अजिंठा विद्यार्थी वसतिगृहातील विज्ञान विभागाचे गृहपालपद दिले आहे. महाविद्यालयातील पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेले प्रा. मगरे यांनी एका विद्यार्थ्याला वसतिगृहात प्रवेश देण्यासाठी शिफारस केली होती. मात्र, विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे अधिकार आपल्याला असल्याचे सांगत प्रा. इंगळे यांनी प्रवेश देण्यास नकार दिला होता. त्यावरून दोघांमध्ये चार-पाच दिवसांपासून टोकाचे मतभेद झाले. विद्यार्थ्याला प्रवेश देण्यासाठी शनिवारी पुन्हा प्राचार्यांच्या दालनात प्रा. मगरे त्यांचे बंधू आणि मुप्टाचे प्रा. सुनील मगरे आणि प्रा. इंगळे यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली. त्यानंतर अचानक प्रा. मिलिंद मगरे आणि प्रा. इंगळे यांच्यामध्ये फ्रीस्टाइल हाणामारीला झाली. हाणामारीत इंगळे यांना गंभीर दुखापत झाली.