आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारंगी प्रकल्पामध्ये उडी घेऊन ११ वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - शहरालगतच्या नारंगी मध्यम प्रकल्पातील पाण्यात उडी मारून एका १७ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. तब्बल दोन तासांच्या शोधकार्यानंतर त्याचा मृतदेह मिळून आला. प्रशांत रमेश चव्हाण १७ असे मृत तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रशांत हा शहरातील सुख-शांतीनगरमध्ये राहत असे. तो शहरातील विनायकराव पाटील महाविद्यालयात इयत्ता ११ वीत होता. शनिवारी सायंकाळी त्याचा शर्ट, चप्पल नारंगी मध्यम प्रकल्पाच्या परिसरात तर सायकल धरणाच्या भिंतीवर उभी असलेली काही युवकानी बघितली. त्यांनी प्रथम आसपास कोणी दिसते का याचा शोध घेतला, मात्र कोणी आढळले नाही. दरम्यान शर्ट व सायकलवरुन त्याच्या घरी ही बाब कळविली. त्यांनी तत्काळ बंधा-याकडे धाव घेवून कपडे व सायकल ओळखली. दुसरीकडे या घटनेची माहिती मिळताच सेनेचे तालुकाप्रमुख रमेश बोरनारे, नगरसेवक राजेंद्र साळुंके, दीपक साळुंके, निखिल वाणी, फौजदार रामहरी जाधव, सचिन सोनार,दीपक सुरोशे यांनी धाव घेतली. सायंकाळची वेळ असल्याने सुरुवातीला पाण्यात उतरून प्रशांतचा शोध घेण्यास कोणीच उतरेना, मात्र या घटनेची माहिती कळताच पोलिस कर्मचारी दत्ता भावे यांनी येवून थेट पाण्यात उतरून शोध मोहीम सुरु केली. ते उतरल्यावर अशोक नाईक हेही त्यांच्या मदतीला गेल्यावर तब्बल दोन तासानंतर प्रशांतला शोधण्यात यश आले. मात्र प्रशांतला पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यु झाला होता. त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी वैजापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
...तरीही शोध सुरूच ठेवला
पाण्यात प्रशांतचा शोध घेत असलेल्या तरणपटू अशोक नाईक यांना काचेची बाटली लागली. जखम झाल्यावरही पाण्यातून बाहेर न येता त्यांनी प्रशांतचा शोध सुरूच ठेवला. अखेरीस शहर पाणीपुरवठा योजनेच्या वाहिनीजवळ प्रशांतचा मृतदेह मिळाल्यावर अशोक बाहेर आले.
बातम्या आणखी आहेत...