आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियम डावलून सुरू केलेले वर्ग होणार बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्‍म‍ि छायाचित्र - Divya Marathi
प्रतिकात्‍म‍ि छायाचित्र
कन्नड - विनापरवानगी सुरू असलेले पाचवी व आठवीचे सर्व वर्ग तत्काळ बंद करून लेखी अहवाल केंद्रप्रमुखांना सादर करण्यासाठी आदेशित केले आहे. लेखी आदेशानंतरही ज्या शाळांमध्ये वर्ग चालू असल्याचे निदर्शनास येईल, त्या मुख्याध्यापक व संस्थाचालकांविरुद्ध आरटीई अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा खुलासा कन्नड तालुका गटशिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांनी दैनिक "दिव्य मराठी'मध्ये रविवारी प्रसिद्ध झालेल्या "आरटीई नियमांना डावलून वर्ग सुरू' या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर केला.

आरटीईअंतर्गत बालकांच्या मोफत सक्तीच्या शिक्षण अधिनियम २००९ च्या नियमांना डावलून कन्नड शहरातील काही भागामध्ये असलेल्या शाळांमध्ये चौथी, पाचवीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. जेथे इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग आहेत. तेथे पाचवीचा वर्ग सुरू करता येतो. मात्र, त्या शाळेच्या एक किमीच्या परिघातील शाळेत पाचवीचा वर्ग नसावा. तसेच जेथे इयत्ता पहिली ते सातवी किंवा इयत्ता पाचवी ते सातवीचे वर्ग असतील तिथे आठवीचा वर्ग सुरू करता येणार आहे, परंतु त्या शाळेच्या तीन किमीच्या परिघातील दुसऱ्या शाळेत आठवीचा वर्ग नसावा, असे नियम आहेत. तथापि, या नियमाचे पालन करताच एक किमीच्या आत दुसरी शाळा असताना चौथीचा वर्ग सुरू केला आहे, तर काही ठिकाणी आठवीचे वर्ग सुरू केल्याने शहरातील काही विद्यार्थी मिळेनासे झाले.