आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्रीय संगीताच्या मैफलींचे पुनरुज्जीवन,पं. नेरळकर यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त वर्षभरात ८१ मैफली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शास्त्रीय संगीतात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या काळाच्या ओघात जवळपास संपत आलेले खासगी मैफलींचे युग पुन्हा अवतरत आहे. संगीत नाटक अकादमीने गौरवलेले ख्यातनाम शास्त्रीय गायक पं. नाथराव नेरळकर यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त ८१ खासगी मैफली आयोजित करण्यात येत आहेत. त्यात नवीन पिढीतील गायकांचे गाणे ऐकायची संधी कानसेनांना मिळणार आहे.
भारतीय शास्त्रीय संगीतात मोठया मैफली खासगी मैफली या दोन प्रकारच्या मैफलींनी संगीत दूरदूरपर्यंत पोहाेचले. मात्र अलीकडच्या काळात खासगी मैफली कमी होत होत जवळपास बंदच झाल्या. कलावंतांना मोठ्या मैफलींत मिळणारी बिदागी नंतरच्या काळात वाढत गेलेले बिदागीचे आकडे याचाही यावर परिणाम झाला.

पण आता खासगी मैफलींची खंडित होत चाललेली परंपरा पुन्हा बाळसे धरण्याची आशा आहे. ख्यातनाम शास्त्रीय गायक पंडित नाथराव नेरळकर यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त वर्षभरात ८१ खासगी मैफलींचे आयोजन करण्यात येणार आहे.

सोमवारी सायंकाळी वाजता
उद्या सोमवारी सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या हाॅलमध्ये सायंकाळी सात वाजता अशाच एका मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात मुंबईचे पं. अमरेंद धनेश्वर हेमा नेरळकर-उपासनी यांचे गायन होणार आहे.

नव्यांचे गाणे ऐकण्याची संधी
याकार्यक्रमाच्या संयोजिका हेमा नेरळकर म्हणाल्या की, पं. नेरळकर यांचा ८१ वा वाढदिवस नुकताच गोकुळाष्टमीला झाला. त्यानिमित्ताने ८१ मैफलींची ही कल्पना समोर आली. नवीन गायक कलावंतांना त्यातून व्यासपीठ तर मिळेलच पण रसिकांनाही ती पर्वणी असणार आहे.

यातून रसिकता वाढेल
‘दिव्यमराठी’शी बोलताना पं. नेरळकर म्हणाले की, संगीत क्षेत्रात वावरताना माझा पं. कुमार गंधर्व, पं. भीमसेन जोशी, किशोरी आमोणकर, पं. जसराज, उस्ताद झाकीर हुसेन यांच्यासह अनेक दिग्गजांचा सहवास लाभला. मोठ्या आणि खासगी मैफली एेकता आल्या. खासगी मैफलींचे महत्त्व खूप मोठे आहे. त्यातून ऐकणाऱ्यांची रसिकता वाढते. मोठ्या मैफलीत गायक रसिक यांच्यात फारसा संवाद होत नाही. पण खासगी मैफलीत गायक बोलतात, संवाद साधतात आणि कलावंत - रसिक यांची समीपता तयार होते. त्यातून खूप काही नवीन शिकायला मिळते.
बातम्या आणखी आहेत...