आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महास्वच्छता अभियानासाठी शहर सज्ज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिसर्‍या औरंगाबाद शहर महास्वच्छता अभियानासाठी शहर सज्ज झाले आहे. यात सहभागी होणाऱ्या समूहांची संख्या वाढतच असून सर्वांनीच शहर कचरामुक्त करण्यासाठी कंबर कसली आहे. शहर स्वच्छ करण्यासाठी जपानमध्ये वापरली जाणारी पद्धतच येथे राबवायची आहे. शहरात झाडू मारायचा नसून केवळ कागदाचे तुकडे, पॉलििथन बॅग, रिकाम्या बाटल्या, रॅपर असा कचरा गोळा करायचा आहे. यात सहभागी होण्यासाठी शनिवारी सात जपानी पाहुण्यांचे शहरात आगमन झाले.
शहर कचरामुक्त करण्यासाठी सोमवार, २५ आॅगस्ट रोजी शहर महास्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. यात नेमके कसे सहभागी व्हायचे, कचरा कसा गोळा करायचा, गोळा केलेल्या कचऱ्याचे काय करायचे...याबाबत अभियानाचे समन्वयक चैतन्य भंडारे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

असे व्हा सहभागी
या महाअभियानात सहभागी होण्याच्या दोन पद्धती आहेत.

१-वैयक्तिक पातळीवर : जर आपला समूह नसेल, आपण एखाद्या संघटनेत सहभागी नसाल तरीही आपण या महाअभियानात सहभागी होऊ शकता. यासाठी आपणास एक पोते किंवा मोठी ५० मायक्रॉनपेक्षा अधिक जाडीची कॅरीबॅग घ्यायची आहे. आपल्या घराजवळील २० मीटरचा परिसर आपण स्वच्छ करायचा आहे. इथला कचरा गोळा करून या कॅरीबॅगमध्ये जमा करावा. नंतर ही बॅग आपल्या घराजवळील कचराकुंडीत टाका किंवा तेथे ठेवून द्या.

२-सांघिक पातळीवर : जर शाळा, महाविद्यालय, स्वयंसेवी संघटना, मित्रमंडळ, महिला मंडळ आदी असेल तर अभियानात सहभागी होण्यासाठी पुढील प्रक्रिया आहे.

साडेसहा वाजता गोळा व्हा : सोमवारी सकाळी साडेसहा वाजता आपल्या वॉर्डातील एका ठिकाणी गोळा व्हा. हे ठिकाण आपणच ठरवा. येताना एक पोते आणि जाड कॅरीबॅग सोबत आणा. त्या ठिकाणी इतर समूह दिसला तर तत्काळ इतर ठिकाण निवडा. गोळा झाल्यानंतर रिंगण करून सर्वांना एकमेकांचे चेहरे दिसतील असे उभे राहा.

टीम लीडर निवडा : आपल्या समूहाचा प्रमूख असेलच. तो नसेल तर आपल्यापैकीच एकाला लीडर म्हणून निवडा.

विषय मांडा :आपण कशासाठी जमलो आहोत हे स्पष्ट करा. तिसऱ्या औरंगाबाद शहर महास्वच्छता अभियानासाठी जमलो आहोत. पुढील तासाभरात आपणास आपले शहर स्वच्छ करायचे आहे, हेही सांगा.

समूहात पसरा : यानंतर चार-चार जणांचे उपसमूह तयार करा. या चौघांनी त्याच परिसरातील २० मीटर परिसरात जावे. चार जणांमध्ये एक पोते सोबत आणावे.

कचरा जमा करा : यानंतर प्लास्टिकचा कचरा कॅरीबॅगमध्ये जमा करा. उर्वरित सगळा कचरा पोत्यात भरा. यात कागदाचे तुकडे, रिकामे रॅपर्स, खराब कपडे असा सर्वच कचरा जमा करावा.
पुन्हा भेटा : कचरा गोळा केल्यानंतर पुन्हा एका ठिकाणी जमा व्हा. आपल्या कचऱ्याच्या बॅग आणि पोते तेथे घेऊन जा. येथे आपल्या कचऱ्याच्या बॅग मधोमध ठेवा. आपण केलेल्या कामाबद्दल एकमेकांना धन्यवाद द्या. कचऱ्याच्या बॅगसोबत आपला एक ग्रुप फोटो काढा. हे फोटो abadcmc@yahoo.com या ईमेल आयडीवर पाठवा. त्यात स्वच्छता केलेल्या परिसराचे नाव, ग्रुप लीडरचा संपर्क क्रमांक आणि सदस्यांचे नाव टाका.
नियमित स्वच्छतेचा निर्धार : हे अभियान वर्षात एक दिवस राबवले तरी शहर स्वच्छ होईल; पण हे नियमितपणे राबवले तर शहरात कधीच कचरा दिसणार नाही. यासाठी नियमितपणे अभियान आपल्या कॉलनीत, वॉर्डात राबवण्याचा निर्धार करा. शक्यतो दर रविवारी आपण यासाठी भेटत जाऊ, असा संदेश देऊन अभियान समाप्तीची घोषणा करा.

महानगरपालिका गोळा करणार पोती : आपले कचऱ्याचे पोते आपल्याजवळील कचरा कुंडीजवळ नेऊन ठेवा. तेथून महानगरपालिकेची वाहने ती गोळा करून नारेगाव येथील कचरा डेपोत नेऊन टाकतील. कोठे एखादे पोते न्यायचे विसरले असेल तर आयोजन समितीला आवर्जून कळवा.
पोस्टर काढून स्वच्छता
घाण, कचरा आिण दुर्गंधीबरोबरच पोस्टरबाजांनीही शहर विद्रूपीकरणात भर घातली आहे. शिवनेरी मित्रमंडळाने नेहमीच शहर स्वच्छतेला प्राधान्य देऊन आपली जबाबदारी पार पाडली आहे. आपला व आसपासचा परिसर स्वच्छ ठेवून त्यांनी सर्वांसमोर नेहमीच आदर्श ठेवला आहे, आता कोचिंग क्लासेस, सर्कस, व इतर प्रकारचे पोस्टर्स काढून ते उद्याच्या महास्वच्छता अभियानात सहभागी होत आहेत. त्यांचे हे स्वच्छता अभियान अमरप्रीत चौक ते शहानूरमियाँ दर्गा या परिसरात होणार असून यात त्यांचे ५० स्वयंसेवक असतील.
उत्साह वाखणण्याजोगा
या अभियानाला मिळत असलेला प्रतिसाद चकित करणारा आहे. हे अभियान जपानमध्ये राबवले जाते त्याप्रमाणेच अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने राबवले जाणार आहे. दररोज नवनवीन समूह आम्हाला जॉइन होत आहेत. शहराला कचरामुक्त करण्यासाठी असणारी तळमळच यातून प्रकट होते
-चैतन्य भंडारे, समन्वयक, औरंगाबाद शहर महास्वच्छता अभियान
फोटो पोस्ट करा
आपण अभियानात सहभागी होत असल्याबद्दलचे स्टेटस फेसबुकवर अपडेट करा.स्वच्छता केलेल्यांचे फोटो ‘DB Star Maharashtra’या पेजवर पोस्ट करू शकता. अधिक माहितीसाठी
इव्हेंट पेज- https://www.facebook.com/events/693761554031211/
डीबी स्टार पेज- https://www.facebook.com/DbStarMaharashtraDivyaMarathi
लक्षात ठेवा
दिनांक : २५ ऑगस्ट २०१४
वेळ : सकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत
ठिकाण : आपल्या नजीकचा २० मीटर परिसर
संपर्क-चैतन्य भंडारे- ८४४६३९१६३५, सी.जी.आगलावे- ९४२२२१०४२६, गिरीश मगरे-९३२६२०९५१६ (फक्त मेसेज करा. आपणास स्वत: संपर्क केला जाईल.) ई मेल-abadcmc@yahoo.com

अहवाल तयार आहे
या प्रकरणी आमच्या दक्षता पथकाने चौकशी केली आहे. त्याचा अहवालही तयार आहे. लवकरच तो विभागीय उपायुक्त कार्यालयाला पाठवला जाईल
-सरिता सुत्रावे, उपजिल्हाधिकारी (रोहयो)