आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होय, आम्ही सहभागी होणार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आठ जपानी पाहुण्यांच्या उपस्थितीत शहरात २५ ऑगस्ट रोजी राबवल्या जाणाऱ्या महास्वच्छता अभियानाच्या संकल्पनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यात सहभागी होण्यासाठी आतापर्यंत शहरातील ५० हून अधिक समूह, संस्थांनी नोंदणी केली आहे. औरंगाबाद मनपाही यात सहभागी आहे. अवघ्या तासाभरात शहराचा चेहरा बदलण्यासाठी विद्यापीठ, सीएमआयए, मसिआ, एमजीएम संस्थेसह शाळा, महाविद्यालये, मति्रमंडळ सज्ज आहेत. आपणही आपले शहर स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
२५ ऑगस्ट रोजी तिसरे शहर महास्वच्छता अभियान राबवले जाणार आहे. "डीबी स्टार'ने १८ ऑगस्ट रोजी याबाबत ‘तुमच्या शहरात स्वच्छतेसाठी येतोय, तुम्ही सहभागी होणार ना?’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यास सुजाण वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
यांचे सहकार्य, सहभाग
१- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
२- पोलिस आयुक्तालय
३- सीएमआयए
४- मसिआ
५- जेएनईसी अभियांत्रिकी महाविद्यालय
६- महात्मा गांधी मिशन महाविद्यालय
७- विभागीय क्रीडा संकुल
८- औरंगाबाद डेव्हलपमेंट फोरम
९- मी औरंगाबादकर ग्रुप
१०- गरवारे कम्युनिटी सेंटर
११- दीपशिखा फाउंडेशन
१२- ऑल महाराष्ट्र मुस्लिम तेली समाज
१३- तंझीम- फारिगाने- ए- जामियात
१४- जागृती मंच
१५- ऊर्जा मंच
१६- इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन
१७- औरंगाबाद इंडस्ट्रियल सप्लायर्स असोसिएशन
१८- टायटन्स फुटबॉल ग्रुप
१९- इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर
२०- गीतांजली फाउंडेशन
२१- इन्शा ग्रुप, मिल कॉर्नर
२२- शाश्वत महिला बचत गट
२३- कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री, औरंगाबाद शाखा
२४- शंभूराजे माध्यमिक विद्यालय, बीड बायपास रोड
२५- मिलिंद महाविद्यालय
२६- शिवनेरी मति्रमंडळ
२७- यश कन्स्ट्रक्शन अँड स्टाफ
लक्षात ठेवा
दिनांक : २५ ऑगस्ट २०१४
वेळ : सकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत
ठिकाण : आपल्या नजीकचा २० मीटर परिसर
संपर्क : चैतन्य भंडारे- ८४४६३९१६३५, सी.जी.आगलावे- ९४२२२१०४२६, गिरीश मगरे- ९३२६२०९५१६ (फक्त मेसेज करा. आपणास स्वत: संपर्क केला जाईल.) ई- मेल- abadcmc@yahoo.com
सोमवार २५ ऑगस्ट
चार्लीची जनजागृती

परदेशी पाहुण्यांच्या सोबतीने आयोजित या स्वच्छता अभियानाची माहिती देण्यासाठी औरंगाबादचा ज्युनियर चॉर्ली चॅप्लिन शहरात जनजागृती करत आहे. त्याने कॅनॉट, एमजीएम, जेएनईसी आदी ठिकाणी लोकांना यात सहभागी होण्याचा संदेश दिला. त्याला पाहण्यासाठी कानाकोपऱ्यात लोक एकच गर्दी करत आहेत.
फेसबुक पेजला भेट द्या
अभियानाविषयी घडामोडीची माहिती देण्यासाठी फेसबुकवर खास पेज तयार करण्यात आले आहे. खालील अॅड्रेसवर गेल्यास सविस्तर माहिती मिळेल.
इव्हेंट पेज- https://www.facebook.com/events/693761554031211/
डीबी स्टार पेज- https://www.facebook.com/ DbStarMaharashtraDivyaMarathi