आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Clean The Premises Issue At Aurangabad, Maharashtra

आज महास्वच्छता : घराबाहेर पडा, परिसर स्वच्छ करा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चला,उठा, तयार व्हा... औरंगाबाद शहर कचरामुक्त करण्यासाठी... सोमवारी सकाळी ते हा वेळ आवर्जून राखून ठेवा.. तिसऱ्या औरंगाबाद शहर महास्वच्छता अभियानात सहभागी होण्यासाठी. घरातून एक पोते (गनीबॅग) आणि ५० मायक्रॉनपेक्षा अधिक जाडीची मोठी कॅरीबॅग सोबत घ्या... कागद, रॅपर, बाटल्या, प्लॉस्टिक, जुने खराब पोते गोळा करा आणि पोत्यात भरा... या कामाचे एक छायाचित्र काढा... तासाभरात शहराचा चेहरा बदललेला दिसेल... चला तर आपले शहर स्वच्छ करूया...
औरंगाबाद मनपाचे सहकार्य आणि आठ जपानी स्वच्छतादूतांच्या उत्साहात सोमवारी सकाळी ते वाजेपर्यंत शहरभर तिसरे महास्वच्छता अभियान राबवले जात आहे. यात सरकारी कार्यालये, शासकीय खासगी शाळा, महावदि्यालये, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, गृहनिर्माण संस्था, छोटे मोठे व्यापारी, गणेश मंडळे, महिला बचत गट, खासगी वैद्यकीय व्यावसायिक, महिला मंडळे, मित्र मंडळे आणि नागरिकांनी वैयक्तिकरीत्या सहभाग नोंदवायचा आहे. सहभागी होणाऱ्या गटाला, समूहाला जपान सरकारच्या वतीने एक प्रमाणपत्र दिले जाणार आहे. सकाळी साडेसहा वाजता आपल्या वॉर्डाजवळ जमून आपणास हे अभियान यशस्वी करायचे आहे. यासाठी सकाळी सात वाजता महानगरपालिकेच्या वतीने सायरन वाजवून अभियान सुरू करण्याची घोषणा केली जाईल. तासाभरात जमा केलेला प्लास्टिक, पॉलिथनिचा कचरा कॅरीबॅगमध्ये, तर इतर कचरा पोत्यात भरून आपल्या नजीकच्या कचराकंुडीजवळ नेऊन ठेवा. महानगरपालिकेच्या गाड्या हा कचरा घेऊन जातील.
आजचा दिवस महत्त्वाचा
गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहत असलेल्या कचरामुक्त शहराचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आजचा दिवस उजाडला आहे. यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आपण सर्वांनी आपल्या भागातील कचरा साफ करून स्वच्छतेचा एक नवीन आदर्श उभा करायचा आहे. कोणतीही सबब देता घराबाहेर पडा आणि आपल्या परिसरातील २० मीटर परिसर स्वच्छ करा. -चैतन्यभंडारे, समन्वयक,औरंगाबाद शहर महास्वच्छता अभियान
पालिकाकचरा घेऊन जाणार
ऐतिहासिक पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे आपले शहर कचरामुक्त करून स्वच्छ सुंदर करण्यासाठी संपूर्ण शहरवासीय या मोहिमेत सहभागी व्हा. जमा कचऱ्याच्या पिशव्या आपल्या भागातील नजीकच्या कचराकुंडीजवळ ठेवा. तेथून पालिकेची वाहने तो जमा करून घेऊन जातील. एकही कचऱ्याची पिशवी तेथे राहणार नाही, याची आम्ही खात्री देतो. -दिलीपसुर्यवंशी,
घनकचराव्यवस्थापन अधिकारी, मनपा
प्रभागअ- रोशन मकवाना- ८४०७९३७०२०
प्रभागब-प्रियंका केसरकर- ८४१२०७२०२०
प्रभागक- व्ही.डी.राठोड- ९७६४९९९७७४
प्रभागड- एस.आर.जरारे- ९७६४९९९४३५
प्रभागई- विठ्ठल डाके- ८००७३२२२४४
प्रभागफ- एस.एम.अभंग- ९७६४९९७१५३
यांना करा संपर्क
संपर्क-चैतन्य भंडारे- ८४४६३९१६३५,
सी.जी.आगलावे-९४२२२१०४२६,
गिरीशमगरे- ९३२६२०९५१६.
दिलीपसूर्यवंशी, घनकचरा
व्यवस्थापन अधिकारी- ९७६४९९९४३६
आपण केलेल्या कामाची छायाचित्रे आपल्या भागाचे नाव, समूहाचे नाव, समूह प्रमुखाचे नाव, संपर्क क्रमांक यांच्यासह पुढील आयडीवर ई-मेल करा-abadcmc@yahoo.com . अभियानाविषयी अधिक माहितीसाठी फेसबुकवरील या खास पेजला भेट द्या.
इव्हेंटपेज- https://www.facebook.com/events/693761554031211/
डीबीस्टार पेज- https://www.facebook.com/DbStarMaharashtraDivyaMarathi