आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छ शहर अभियान: शहर स्वच्छतेसाठी पुढे आले अनेक हात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तरुण असो की वृद्ध, महाविद्यालयीन युवक असो की संस्कार केंद्रातील स्वयंसेवक... सा-यांनीच आता डीबी स्टार स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवून शहर स्वच्छ, सुंदर आणि हिरवे करण्याचा संकल्प केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ठिकठिकाणी रोज तो तो भाग स्वच्छ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. डीबी स्टारचे हे लोण आता सर्व थरात आणि सर्वत्र पोहोचले आहे.
कुणी लोकसहभागातून स्वच्छता मोहीम राबवत आहे, कुणी आपला भाग कचरामुक्त करून समाधान मिळवत आहे, तर कुणी आसपासच्या परिसरातही स्वच्छतेचा संदेश पोहोचवत आहे. डीबी स्टारने सुरू केलेल्या या अभियानात आपल्या परीने जास्तीत जास्त लोक सहभागी होत आहेत. सुरुवातीला शिवनेरी मित्रमंडळाचे सी.जी.आगलावे, राहुल इंगळे यांनी अनेक भागांत जाऊन लोकांशी संपर्क करून स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगितले. कचरामुक्त शहरासाठी जनजागृती सुरू केली. त्यातूनच ही मोहीम दिवसेंदिवस आणखी व्यापक होत आहे.
युवकांचा पुढाकार
बबलू अंधारे या युवकाच्या पुढाकाराने हडको येथील गोदावरी शाळा ते मनपा शाळेच्या ग्रीनबेल्टवरील जागा कचरामुक्त करण्यात आली. या मुलांनी केवळ स्वच्छता केली नाही, तर तेथे वृक्षारोपणही केले.
बालसंस्कार केंद्राचा पुढाकार : मयूरनगरातील स्वामी समर्थ बालसंस्कार व आध्यात्मिक विकास केंद्राच्या वतीनेही स्वच्छता अभियान राबवण्यात आले. मीना जोशी यांच्या पुढाकाराने ही मोहीम पार पडली.
सौभाग्यनगर मित्रमंडळाचा पुढाकार : हडको येथील सौभाग्यनगर मित्रमंडळातर्फेही अभियान राबवण्यात आले. यात नगरसेवक किशोर नागरे यांनीही सहभाग नोंदवला.
दर्शन विहार परिसर : शिवनेरी मित्रमंडळाचे आगलावे, शरद भदाणे यांच्या पुढाकाराने साता-यातील दर्शनविहार या सोसायटीत स्वच्छता अभियान राबवण्यात आले.