आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोस्टर काढून स्वच्छता करणारे हातही वाढले, परत घाण करण्याचे आवाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सुरुवातीला चार-सहा मित्र एकत्र आले आणि जयभवानीनगर चौकातील शिवाजी पुतळ्याची शांततेत सफाई करायला लागले. जाता-येता लोक हे पाहत होते. मग बघ्यांचे रूपांतर सफाई करणाऱ्या जबाबदार नागरिकांमध्ये झाले. बघता बघता पोस्टरपेक्षा सफाई करणारे हात वाढले आणि दोन तासांच्या परिश्रमानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परिसर चकाचक झाला. अशा प्रकारे ‘डीबी स्टार’ने सुरू केलेला ‘कारवां’ वाढत चालला आहे.

जयभद्रा मित्रमंडळाचे ओम गावडे आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रकाश धुर्वे यांनी पुढाकार घेत सकाळीच सिडको एन-२ परिसरातील शिवाजी पुतळ्याच्या आजूबाजूचे पोस्टर काढण्यास सुरुवात केली. त्यांना हनुमान कवचत, गणेश जाधव, नितीन पाटील, पंकज फिरके, सौरभ सज्जराव, अजय गायकवाड, अतुल पवार, योगेश नरवडे, सतीश परिहार, मनोज ससाणे, मनपाचे कर्मचारी कचरू ठोकळ, रवींद्र भालेराव, दामोदर दाभाडे यांची मदत मिळाली. पुतळ्याच्या ग्रेनाइटवर लावलेले पोस्टर, फलक आणि बॅनर काढले. महाराजांच्या गळ्यातील कुजलेला हार काढून पुतळा परिसर धुवून चकाचक केला.

मार्गावरीलपोस्टर हटवले
पुंडलिकनगरपरिसरातील जयभवानीनगर ते गजानन मंदिर मार्गावरील सर्व पोस्टर राहुल इंगळे मित्रमंडळाचे अक्षय ताठे, अमोल उबाळे, संतोष साबळे, समाधान सोळंके यांनी काढले. तसेच शिवाजी पुतळा परिसरही स्वच्छ केला.

घरावरील शुभेच्छा फलक काढला
हेअभियान सुरू असतानाच जयभवानीनगर येथे एका घरावर गणेश सोनटक्के नावाच्या कार्यकर्त्याने लावलेला नवीन वर्षाच्या संक्रांतीच्या शुभेच्छा देणारा फलक पानवर

रविवारी अनेक संस्था होणार सहभागी
ज्येष्ठनागरिक आणि प्रयास सामाजिक संस्था मिळून रविवारी (१० जानेवारी) स्वच्छता अभियान राबवणार आहेत. आपापल्या भागातील लोकांनी यामध्ये सहभागी होऊन स्वच्छता करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शहर आपले, बिनधास्त पोस्टर काढा
सरकारी मालमत्तेचे विद्रूपीकरण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला आता क्षमा नाही. लोकांनी पुढाकार घेऊन स्वच्छता करणे, ही अतिशय समाधानकारक बाब आहे. शहर आपले आहे. आपल्याला मिळून ते सुंदर ठेवायचे आहे. त्यामुळे पूल, सौंदर्यबेटे, सरकारी इमारतींवर चिकटवलेले पोस्टर काढून शहरवासीयांनी हातभार लावावा. लवकरच यावर प्रतिबंध लावण्यासाठी एका जबाबदार अधिकाऱ्याची नेमणूक केली जाईल. सुनीलकेंद्रेकर, आयुक्त,मनपा