आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छ, सुंदर शहर, विजयादशमीला मनामनात चेतवली स्वच्छतेची ज्योत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दसरासण मोठा, नाही आनंदाला तोटा, असे म्हटले जाते. कुठलेही शुभकार्य करून हा सण साजरा करायचा असतो. गारखेडा परिसरातील तिरुपती पार्क येथील रहिवाशांनी डीबी स्टारच्या स्वच्छ, सुंदर शहर अभियानात सहभागी होत संपूर्ण परिसर स्वच्छ करून खऱ्या अर्थाने हा सण साजरा केला. प्लास्टिक पिशव्या, गाजर गवत, केरकचरा, घुटख्यांच्या पुड्या आणि विडी, सिगारेटची थोटके आदी कचरारूपी रावणाचे दहण करून मनामनात स्वच्छतेची ज्योत चेतवली.
आबालवृद्धांसह महिलांनीही मोठ्या आनंदाने हाती झाडू-खराटे, फावडे घेऊन मोकळ्या जागा, क्रीडांगणे आणि अंतर्गत रस्ते चकाचक केले. यापुढे महिन्यातून एकदा रविवारी हे अभियान सुरू ठेवून आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा निश्चयही या सर्वांनी केला.
सकाळपासूनच तिरुपती पार्क परिसरात लहान-मोठे, महिला-पुरुष आणि बालगोपाळांची धांदल सुरू होती. दसऱ्याचा मुहूर्त सर्वच कामांसाठी चांगला समजला जातो. मग आपणही या सणाच्या दिवशीच परिसर स्वच्छ करून आरोग्यदायी वातावरण निर्माण करू, असे ठरवले. त्यात कॉलनीतील मीना जोशी, शीतल सराफ, प्रीती गणोरकर, दीपा पातूनकर, नलिनी पाटील, विमल शिंदे, रिंकी मेठी, लता कुलकर्णी, माधुरी कुलकर्णी, प्रतिभा शेवलीकर, रेवती कुलकर्णी, वैशाली नानकर, अमिता देशमुख, मानसी देशपांडे, पुष्पा कापसे, पळणीटकर, स्वाती अतकरे, कुलदीप देशपांडे, राजू गायकवाड, अनुज पाटील, तसेच महेंद्र मेठी, के.डी.पेहेरकर, एन.टी.भोसले, बी.ए.घोडके, दिनेश देशपांडे, डॉ.अविनाश दिवाण, सुधाकर देशमुख, दत्तात्रय वाकोडे, ए. बी. पानसे, मयूरी लाहोटी, लता कुलकर्णी, अनिल कोंडापल्ले यांनी सहभाग घेतला.

तासाभरातच कायापालट
बघताबघता काही तासांतच प्लास्टिक पिशव्या, केरकचरा, घुटख्यांच्या पुड्या आिण विडी-सिगारेटची थोटके जमा केली. याशिवाय परिसरातील क्रीडांगणे, मोकळ्या जागा, आणि रस्ते झाडू-खराट्याने चकाचक करून कचऱ्याची विल्हेवाट लावली. आता प्रत्येक महिन्यात एका रविवारी हे काम करण्याचा ध्यासही या सर्वांनी घेतला आहे.