आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॉलनीत कचऱ्याचा ढीग साचलाय? स्वच्छता अ‍ॅपवर तक्रार पोस्ट करा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- तुमची कॉलनी अथवा वसाहतीत अस्वच्छता पसरली असेल, कचऱ्याचा ढीग साचला असेल किंवा एखादा प्राणी मरून पडल्याने दुर्गंधी पसरली असेल तर गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ‘स्वच्छता’ अॅप डाऊनलोड करा. त्यावर तक्रार पोस्ट करा. महापालिकेचे कर्मचारी येऊन तुम्ही पोस्ट केलेल्या परिसराची साफसफाई करतील. औरंगाबाद महानगरपालिकेत गेल्या चार दिवसांपासून ही सुविधा सुरू झाली आहे. याआधी शहरातील नागरिकांनी स्वच्छता अॅप डाऊनलोड करून आपल्या परिसरातील अस्वच्छतेच्या तक्रारी पोस्ट केल्या होत्या. मात्र महापालिकेत स्वच्छता अॅपवर टाकलेल्या तक्रारींचा डेटा मिळण्याची आजवर सोयच नव्हती. त्यामुळे त्या तक्रारींवर कोणतीही कारवाई झाली नाही. आता चार दिवसांपूर्वी ही यंत्रणा कार्यरत झाली असून नागरिकांना त्यांच्या परिसरातील तक्रारी या अॅपवर पोस्ट करता येतील. 

जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात केंद्राचे पथक पुन्हा शहरात स्वच्छ भारत अभियानाचे सर्वेक्षण करणार आहे. यात नागरिकांच्या सहभागांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य देण्यात आले असून नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग वाढवण्यासाठी ही यंत्रणा कार्यान्वित केली. नागरिकांनी हे अॅप डाऊनलोड करून अभियानात सहभागी होण्याचे आवाहन अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी केले. मात्र मनपापुढे नारेगाव कचरा डेपोसह नियमित घनकचऱ्याची वाढलेली समस्या वैयक्तिक शौचालयांचे मोठे अाव्हान असणार आहे. 


अशी पोस्ट करा स्वच्छता अॅपवर तुमची तक्रार 
अॅपमुळे तुम्हाला सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या तक्रारी जसे मृत प्राणी आहे.. कचऱ्याचा ढीग आहे.. कचरागाडी आली नाही.. यातील जी तक्रार लागू असेल त्यावर क्लिक करा, नंतर त्या परिसराचे लोकेशन लँडमार्क टाइप करा. हे झाल्यावर स्क्रीनवर खालीच पोस्ट करा, असे शब्द दिसतील त्यावर क्लिक करा. झाले ! आपली तक्रार पोहोचल्याचा संदेश दिसेल. 


तक्रारीनंतर अशी होईल कारवाई 
आपलीतक्रार महानगरपालिकेच्या मुख्यालयातील संबंधित विभागाकडे जाईल आणि तो विभाग ती संबधित क्षेत्राच्या जबाबदार कर्मचाऱ्याकडे तत्काळ पाठवेल. तो तक्रार निवारण करून त्याचा तक्रार असलेल्या जागेचा तक्रार निवारणानंतरचा फोटो काढेल पोस्ट करेल. तो संबंधित नागरिकासही तत्काळ दिसेल. 


असे डाऊनलोड करा स्वच्छता अॅप 
आपल्या मोबाइलमधील‘प्ले स्टोअर’वर क्लिक करा, ‘Swachhata-MoHUA’ असून त्याला ‘डाऊनलोड करा’- ‘पसंतीची भाषा निवडा’. अॅप आपला मोबाइल नंबर मागेल, तो योग्य जागी नमूद करा. तुम्हाला लगेच ओटीपी (वन टाइम पासवर्ड) मिळेल. त्यानंतर Post your First complaint (पहिली तक्रार पोस्ट करा) वर क्लिक करा..पुढील कारवाई सुरू होईल. 

बातम्या आणखी आहेत...