आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गतीची गरज, स्वच्छतेत मराठवाडा मागे; मुख्यमंत्र्यांनी कान टोचले, विभागात नांदेड प्रथम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - स्वच्छ महाराष्ट्र अिभयानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या गाव हागणदारी निर्मूलन कृती आराखड्यानुसार मराठवाड्याची प्रगती असमाधानकारक आहे. याबाबत ३० नोव्हेंबर रोजी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या व्हिडिआे कॉन्फरन्सिंग (व्हीसीमध्ये) जिल्हाधिकारी सीईओंना फैलावर घेतले होते. याचा धसका घेऊन जालना जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. दरम्यान, येत्या १० तारखेस परतूर तालुक्यातील गावांमध्ये ४० अधिकारी - कर्मचाऱ्यांचे पथक मुक्कामी जाणार आहे. त्याठिकाणी जनजागृती करून प्रत्यक्ष स्वच्छतागृहाचे काम सुरू करूनच पथक परतेल, असे नियोजन करण्यात आले आहे.

जालन्याला चालू वर्षात स्वच्छतागृह बांधण्याचे ७३ हजार ९८३ एवढे उद्दिष्ट दिले होते. प्रत्यक्षात नोव्हेंबर अखेर फक्त १२ हजार ९९९ स्वच्छतागृहे बांधण्यात आलेली आहे. यामुळे उर्वरीत ६० हजार ९८४ उद्दिष्ट गाठण्याचे आव्हान यंत्रणेवर आहे. औरंगाबाद येथे १८ नोव्हेंबर रोजी डेप्युटी सीईओ (पाणी स्वच्छता) १२ तालुके १०० टक्के हगणदारीमुक्त करण्याच्या अनुषंगाने संबंधित तालुक्याचे बिडीओ यांची विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत मराठवाड्यातील भीषण वास्तव समोर आले. याचा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहाचेला अन् तेथून सुत्रे हलली. ग्रामीण शहरी भागातील जनतेला स्वच्छतेचे महत्व पटवून देत हागणदारी मुक्त गावे करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र, सुस्तावलेली प्रशासकीय यंत्रणा मुख्यालयाशी तुटलेला संपर्क यामुळे स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला जणू खिळ बसली आहे. केवळ प्रसिद्धी अन् त्याच्या नोंदी घेऊन डांगोरा पिटण्याचा एककलमी कार्यक्रम राबविला जात आहे. याचाच परिणाम म्हणून गावे हागणदारी मुक्त करण्यात अडचणी येत आहेत.

काय म्हणतो डिसेंबरचा अहवाल
एक डिसेंबर २०१६ रोजीच्या राज्यस्तरीय अहवालानुसार मराठवाड्यात नांदेड जिल्हा आघाडीवर अाहे. या जिल्ह्याला ४८ हजार ८२२ स्वच्छतागृहे बांधण्याचे उद्दिष्ट दिले होते, प्रत्यक्षात १६ हजार २०४ स्वच्छतागृहे बांधण्यात आली. ३३.१९ टक्के एवढे हे काम असून राज्यात १९ वी रँक आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्यास ४५ हजार ७५३ स्वच्छतागृहाचे उद्दिष्ट दिले होते, त्यापैकी हजार २३० पूर्ण झाले असून केवळ ११.४३ टक्के एवढेच हे काम आहे. यामुळे उस्मानाबाद राज्यात ३४ व्या रँकवर असून मराठवाड्यातसुद्धा आठव्यास्थानी आहे.

परतुर येथे स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गंत गावात विविध ठिकाणी शौचालये बांधण्यात येत आहे. ग्रामस्थांमधून आनंद व्यक्त होत आहे.
जालना राज्यात ३० व्या, मराठवाड्यात चौथ्या
जालना जिल्ह्यास वर्ष २०१६-१७ साठी शासनाने स्वच्छतागृह बांधण्याचे ७३ हजार ९८३ एवढे उद्दिष्ट दिलेले आहे. यापैकी नोव्हेंबरअखेर १२ हजार ९९९ स्वच्छतागृहे पूर्ण झाली आहेत. केवळ १७.५७ टक्के एवढेच काम झाले आहे. यामुळे जालना राज्यात ३० व्या, तर मराठवाड्यात चौथ्या स्थानी आहे.

सूक्ष्म नियोजन करून अंमलबजावणी
^मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एका तालुक्याची निवड करून त्या-त्या गावांमध्ये ४० अधिकारी-कर्मचारी जातील. दोन दिवस मुक्कामी राहून स्वच्छतेबाबत जनजागृती करतील. स्वच्छतागृहाचा अर्ज भरून घेऊन प्रत्यक्ष बांधकाम सुरू करूनच हे अधिकारी-कर्मचारी गावातून बाहेर पडतील, अशा प्रकारचे नियोजन केले आहे. संपूर्ण राज्यभरात ही मोहीम राबवून गावे १०० टक्के हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प आहे.
बबनराव लोणीकर, पाणीपुरवठा स्वच्छतामंत्री,

बातम्या आणखी आहेत...