आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

१० मिनिटांत लिपिक बडतर्फ, मनपा आयुक्त बकोरियांची कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दोन वर्षांपूर्वी अनुकंपा तत्त्वावर महापालिकेत लिपिकपदावर नोकरीस लागलेल्या आणि एमएससीआयटी, टंकलेखन परीक्षा उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र मिळवलेल्या १४ जणांची आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी सात मिनिटांची टायपिंगची परीक्षा घेतली. त्यात नापास झालेल्या पाच जणांना तत्काळ बडतर्फ करण्यात आले. आठ जणांना तंबी देण्यात आली. केवळ दहा मिनिटांत ही कारवाई झाली.
या १४ जणांनी सेवेत आल्यावर संगणक, टायपिंग परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर केले. त्यांना कायम करण्यापूर्वी त्यांची बकोरियांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता परीक्षा घेतली. संगणकावर दोन ओळी टाइप करण्यासाठी त्यांना सात मिनिटे देण्यात आली. तेव्हा सचिन गायकवाड, सय्यद शहाबुद्दीन, जितेंद्र बोर्डे, बिपिन दसरे, योगेंद्रसिंग राजपूत यांना एक शब्दही टाइप करता आला नाही. ते पाहून संतापलेल्या बकोरियांनी त्यांना जागेवरच बडतर्फ केले. काही चुका करत टायपिंग करणाऱ्यांना सुधारणेसाठी डिसेंबरपर्यंतचा अवधी दिला. आजारी असलेल्या अन्य एकाची त्याच वेळी परीक्षा घ्या, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

पदवीधरशिपायाला पदोन्नती
दहावी,बारावी पास उत्तीर्ण आणि अनुकंपामुळे थेट लिपिकपदी नियुक्त झालेल्यांना एकही शब्दही टाइप करता आला नाही. दुसरीकडे पदवीधर असूनही रूपाली अंबट शिपाई म्हणून काम करत असल्याचे निदर्शनास आल्यावर बकोरियांनी त्यांना लिपिक म्हणून पदोन्नती दिली.
२००५ते २०१२ पर्यंत मृत पावलेल्या २६ मनपा कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शुक्रवारी सकाळी सेवेत घेण्यात आले. लिपिक पदावर शाहबाज खान, सय्यद अब्दुल, झकेरिया अहमद, आशा लिमये, अब्दुल अजीज अर्शी, मोहंमद अन्वरोद्दीन कुरेशी, संतोष गायकवाड तर शिपाईपदी सय्यद अहमद सय्यद अख्तर, पंचशीला काजगे, सुनील ताकवाने, बबन राठोड यांसह अन्य दोघांना सेवेत घेण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...