आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘क्लोव्हर डेल’चा अनोखा उपक्रम; मुलांसोबत बागडताना पालकही झाले बालक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- नोकरी, व्यवसायामुळे पालक मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. सुटीचा दिवसही आराम करण्यात जातो, परंतु यंदाचा रविवार मात्र पालक व मुलांसाठी विशेष पर्वणी घेऊन आला होता. कधी नव्हे ते पालकांनी मुलांसोबत खो-खो, कबड्डी, रस्सीखेच, क्रिकेट या खेळांचा मनसोक्त आनंद लुटला. औचित्य होते, महात्मा गांधी मिशन संचलित ‘क्लोव्हर डेल’ स्कूलतर्फे आयोजित अँप्रोच या कार्यक्रमाचे.
पालक, मुलांमध्ये सुसंवाद घडावा आणि एकमेकांना पुरेसा वेळ देता यावा म्हणून सिद्धार्थ उद्यानात या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उद्योजक रणजित कक्कड, मुख्याध्यापिका स्मिता कपूर, उपमुख्याध्यापिका डॉ. शिल्पा देशपांडे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी मिमिक्री, मॅजिक शो, पारंपरिक खेळ, ग्रीटिंग कार्ड बनवणे, टॅटू काढणे आदी खेळ घेण्यात आले. खूप दिवसांनंतर आपण बागेत आलो, पपेट शो पाहिला, मुलांमध्ये असलेले सुप्त गुण ओळखता आले अशा विविध प्रतिक्रिया पालकांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिल्या, तर आज आई-बाबा माझ्यासोबत खेळले त्यामुळे आनंद झाल्याचे मुलांनी सांगितले.
>घरातील काम, नोकरी करताना इच्छा असूनही मुलांना वेळ देऊ शकत नाही. या उपक्रमामुळे माझ्या मुलांच्या आवडी-निवडी कळाल्या. बर्‍याच वर्षांनंतर पुन्हा रस्सीखेच खेळताना मज्जा आली.’’ अपर्णा देसाई, पालक
>आज बर्‍याच दिवसांनंतर आई माझ्यासोबत खेळली याचा आनंद होतोय. आम्ही दोघांनी खूप मस्ती केली. गाणी म्हटली.’’ प्रज्वल देसाई
असा मोकळा वेळ घालवण्याचे क्षण फार कमी मिळतात. दररोजच्या कामात मुलांबरोबरचा आनंद राहून जातो.’’ अपर्णा कक्कड
>दहा वर्षांनंतर आम्ही बागेत आलो. मुलांसोबत खेळण्याचा आनंद काही निराळाच होता. मॅजिक शो, आर्ट हे शाळा, महाविद्यालयानंतर आज पाहिले.’’ रूपाली आणि संदीप वाहूळ, पालक
> आई-बाबासोबत पपेट शो पाहताना आनंद झाला. आता असाच शो मी आई-बाबांना घरी गेल्यावर करून दाखवेल.’’ स्वरा वाहूळ