आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरकुलनंतर आता वाघूर गुन्ह्याची फाइल उघडणार, एकनाथ खडसेंनी दिले संकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- घरकुल घोटाळ्यात आरोपींच्या अटकेला तीन वर्षे पूर्ण हाेत नाही ताेच वाघूर याेजनेतील गैरव्यवहारप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या तपासाला गती मिळणार अाहे. याबाबतचे संकेत खुद्द महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिले अाहेत.
तत्कालीन जळगाव नगरपालिकेने राबवलेल्या घरकुल घाेटाळ्यात २००६मध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर जानेवारी २०१२मध्ये अटकसत्र सुरू झाले हाेते. आता नगरपालिकेने राबवलेल्या वाघूर याेजनेत तपासाची चक्रे फिरू लागली अाहेत. गुरुवारी जळगावात अालेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी बाेलताना वाघूरची फाइल लवकरच उघडणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे घरकुलात अडकलेले नेते नगरसेवकांमागे अाता वाघूरच्या तपासाचा ससेमिरा लागणार अाहे. एकूण ४२ काेटी ६२ लाख ६९ हजार ६१ रुपयांचा हा अपहार अाहे. नगरसेवक नरेंद्र भास्कर पाटील यांनी २८ जुलै २०१२ राेजी शहर पाेलिस ठाण्यात िदलेल्या फिर्यादीवरून भादंिव कलम ४०३, ३०६, ४२०, ४०९, ४६५, ४६८, ४७१, १२० (ब), ३४ तसेच लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम १३(१),(क), १३(१),ड १३(२) प्रमाणे गुन्हा दाखल अाहे. घरकुल प्रकरणाचा तपास असलेले डीवायएसपी प्रशांत बच्छाव यांची पदाेन्नती झाल्याने त्यांच्या रिक्त जागी नियुक्त हाेणाऱ्या अधिकाऱ्यावरच या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी येण्याची शक्यता अाहे.