आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्यात वाढणार: लघु-मध्यम उद्योग क्लस्टरला मान्यता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- औरंगाबादमधील ऑटोमोबाइलचे सुटे भाग तयार करणाºया लघुउद्योगांचा मसिआ ऑटो काम्पोनन्ट क्लस्टर अखेर चार वर्षांनंतर मार्गी लागला आहे. या क्लस्टरसाठी महिनाभरात दोन एकर जागा एमआयडीसी देणार आहे.

छोट्या उद्योगांना महागड्या अत्याधुनिक सुविधा सामायिक स्तरावर उपलब्ध व्हाव्यात, यासाठी केंद्र सरकारच्या लघु, मध्यम उद्योग खात्याने ही योजना आणली होती. त्यानुसार उद्योजकांनी 30 टक्के व सरकारने 70 रक्कम देऊन हा प्रकल्प उभारावयाचा व उद्योगांनीच तो चालवायचा, अशी ही योजना आहे. यासाठी मसिआ या संघटनेने 2007 पासून हालचाली सुरू केल्या. 2009 मध्ये या क्लस्टरसाठी मसिआ ऑटो काम्पोनंट क्लस्टर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्थापन करण्यात आली. अनुप काबरा, पृथ्वीराज शहा, अशोक काळे, राजेश पाटणी, रणजितसिंग गुलाटी यांची संचालक म्हणून नियुक्ती झाली. 2013 च्या उद्योग धोरणात राज्य सरकारने क्लस्टरला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रक्रियेला गती आली. उद्योग खात्याचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा आणि एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांच्या सोबत झालेल्या बैठकीत महिनाभरात जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

फायदा काय?
० उत्पादनाची चाचणी करण्याची अत्याधुनिक यंत्रसामग्री हाताशी असल्याने खर्च कमी
० किचकट प्रक्रिया असणारे नमुने तयार करणे शक्य होणार आहे.
० नव्या उत्पादनांसाठी संशोधन व विकासाचे काम होईल.
० महागड्या चाचणीसाठी खर्च होणारा पैसा आणि वेळ वाचेल.

असे असेल क्लस्टर
जागा : वाळूजमध्ये 2 एकरांवर प्रकल्प
खर्च : 22 कोटी रुपये
सरकारचा वाटा : 13. 23 कोटी रुपये
सहभागी उद्योग : सध्या 22

चार वर्षांनंतर गती
लघुउद्योगांना संजीवनी देणारे हे क्लस्टर आता सुरू होणार आहे. चार वर्षांपूर्वीच ते झाले असते तर आज विस्ताराचे काम हाती घेण्यात आले असते. आम्ही प्रस्ताव केला, तेव्हा 10 एकर जागेची मागणी केली होती, पण आज जागेचे दर वाढल्याने आम्ही दोन एकरांत हे क्लस्टर उभारणार आहोत.
अनुप काबरा, व्यवस्थापकीय संचालक, मसिआ ऑटो काम्पोनंट क्लस्टर प्रायव्हेट लिमिटेड