आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील शाळा अव्वल ,अनुदानात शेवटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद यंथील सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था - Divya Marathi
औरंगाबाद यंथील सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था
आैरंगाबाद- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या थेट अखत्यारीत असलेली हडकोतील सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था राज्यात अव्वल तर देशात दुसऱ्या स्थानी असतानाही अनुदानात मात्र शेवटी असल्याचे चित्र आहे. याउलट विदर्भात सैनिक स्कूल स्थापण्यासाठी जलदगतीने कार्यवाही सुरू झालेली आहे.
सैन्यात मराठी टक्का वाढावा यासाठी महाराष्ट्रात १९९५ मध्ये भाजप-शिवसेना युतीने प्रत्येक जिल्ह्यात सैनिकी शाळा स्थापण्याचा निर्णय घेतला. यानुसार सर्व जिल्ह्यांमध्ये काही अनुदानित तर काही विनाअनुदानित तत्त्वावर सैनिकी शाळा सुरू करण्यात आल्या. परंतु त्यावेळच्या आजच्या सरकारला शासनाची स्वत:ची सैनिकी शाळा असल्याचा विसर पडला. १९७७ पासून आैरंगाबादेत सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था आहे.

राज्यात ३३ सैनिकी शाळा असून मागील वीस वर्षांत २२५ कोटी रुपयांपेक्षा जास्त अनुदान उपरोक्त शाळांना मिळाले. परंतु यातील केवळ ३० विद्यार्थी एनडीएमध्ये दाखल झाले. सैनिक कल्याण विभाग, पुणे मार्फत नाशिक येथे दोन महिने कालावधीचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. याचा निकाल शून्य टक्के आहे.

कमीअनुदान घेणारी संस्था पुढे : याउलटवर्षाला पन्नास लाख रुपयांपेक्षा कमी अनुदान प्राप्त झालेल्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेने १९७७ पासून देशाच्या सैन्याला ४७० पेक्षा जास्त अधिकारी दिले.

यातील ११३ छात्र वायुसेनेत पायलट आहेत. दोन कीर्तिचक्र, शौर्यचक्र, १२ सेन अथवा वायुमेडल, एनडीएत दोन गोल्ड मेडल आहेत. याशिवाय नागरी सेवेतही अनेक छात्र दाखल झाले. कार्तिक नायर नावाचा छात्र भारतीय विदेश सेवेत आहे.
{ राज्यातील सैनिकी शाळा -३८, १६ वर्षांत सैन्यात अधिकारी झालेले छात्र-३०, प्रशिक्षणाचा कालावधी -९ वर्षे. टक्केवारी ०.१० टक्के
{ सातारा सैनिक शाळेचे छात्र (मागील पाच वर्षांत) निवड झालेले छात्र-७२, प्रशिक्षणाचा कालावधी वर्षे, टक्केवारी १६ टक्के
{ सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था (३६ वर्षांत)- निवड झालेले छात्र-४७०, प्रशिक्षणाचा कालावधी-२ वर्षे, टक्केवारी ४५.५ टक्के, आरआयएमसी डेहराडून नंतर देशात दुसरी.
विदर्भातील चंद्रपूर, अकोल्यात नवीन सैनिक स्कूल होणार
मराठवाड्यातीलनावाजलेल्या संस्था अद्याप सुधारण्याच्या प्रतीक्षेत असताना विदर्भात चंद्रपूर अकोला येथे सातारा सैनिक स्कूलच्या धर्तीवर शाळा स्थापण्याची कार्यवाही जोरात आहे. सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेची स्थापनेपासून क्षमता ६० ठेवण्यात आली. परंतु सुविधांअभावी केवळ ५० जागांच प्रतिवर्षी भरण्यात आल्या. उपरोक्त संस्थेत केवळ अकरावी बारावी असे दोनच वर्षे विद्यार्थी असतात.

सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेचा आदर्श घेऊन पंजाब, हरियाणा येथील राज्य सरकारांनी पाच वर्षांपूर्वी सैनिकी शाळा सुरू केल्या. उपरोक्त राज्य सरकारांनी संस्थेला मोठ्या प्रमाणावर अनुदान छात्रांना सुविधा दिल्या. औरंगाबाद येथील संस्थेची व्याप्ती वाढवणे आवश्यक आहे. ब्रिगेडियरबलजितसिंग गिल, निवृत्त