आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्याला मिळणार जादा 50 टीएमसी पाणी; मुक्तिसंग्रामदिनी मुख्यमंत्र्यांची घोषणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (छाया: अरुण तळेकर) - Divya Marathi
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (छाया: अरुण तळेकर)
औरंगाबाद- मराठवाड्यातपहिले वॉटर ग्रीड तयार करण्यात येणार असून दमणगंगा-पिंजाळ प्रकल्पातून तब्बल ५० टीएमसी पाणी मिळणार आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे. केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी लवकरच हा प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे सांगून यामुळे संपूर्ण मराठवाडाच सुजलाम सुफलाम होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री रविवारी शहरात होते. सिद्धार्थ उद्यानातील स्मृतिस्तंभाच्या प्रांगणात फडणवीस यांनी हुतात्मा स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण केले. वीर हुतात्म्यांना अभिवादन करून मानवंदना दिली. या लढ्यात सहभागी स्वातंत्र्यसैनिकांना शुभेच्छा देऊन मुख्यमंत्र्यांनी ध्वजारोहण केले. मुख्यमंत्री म्हणाले, मराठवाड्यातील लढ्यानंतर तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांच्या धाडसी निर्णयामुळे मराठवाडा निझामाच्या जोखडातून मुक्त झाला. कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

पीक विम्याला प्रतिसाद 
मराठवाड्यातून पीक विम्याच्या योजनेला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगून राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभदेखील या विभागातील बऱ्याच शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. 

शासनाने भरपूर निधी दिला 
मराठवाडा विभागाच्या अनेक समस्या आहेत. त्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून राज्य सरकारने प्रयत्न केले. संपूर्ण महाराष्ट्रात अनेक विकास कामे केली. विशेषत: जास्तीत जास्त निधी मिळवून देण्याचा प्रयत्न केला. 

औद्योगिक विकासासाठी वीज सवलत 
मराठवाड्याच्या औद्योगिक विकासासाठी मोठे उद्योग मराठवाड्यात आणण्यावर राज्य सरकारचा भर आहे. त्यासाठी उद्योगांना वीज सवलत देण्यात येईल. त्यात ऑरिक सिटी आणि डीएमआयसीचा मोठा सहभाग असेल. यातून लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटेल 
मराठवाड्यातील पाण्याची समस्या कायमची सुटावी म्हणून राज्यात पहिले वॉटर ग्रीड तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

मुख्यमंत्री म्हणाले... 
- शेतकऱ्यांसाठीच्या अन्नसुरक्षा योजनेत मराठवाड्यातील आकडा उल्लेखनीय असून योजनेंतर्गत ४० लाख शेतकरी कुटुंबांनी लाभ घेतला. 
- विभागातील अनेक प्रलंबित कामे मार्गी लावली. हक्काचे पाणी दिले, धरणांची कामे पूर्ण करण्यात आली. कृष्णा खोऱ्याचे पाणी देण्यास मंजुरी दिली. 
- जलयुक्त शिवारमध्ून मराठवाड्यात शेततळ्यांच्या माध्यमातून साडेचार लाख हेक्टर जमिनीला पाणी मिळवून दिले. 

निजामाच्या जोखडातून मुक्त झाला हैदराबाद आणि मराठवाडा
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक वर्षाने 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद आणि मराठवाडा निजामाच्या जोखडातून मुक्त होऊन स्वतंत्र भारतात आले. त्‍यामुळे 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... सिद्धार्थ उद्यानातील स्मृतिस्तंभाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमाचे फोटो...
 
संबंधीत महत्वाचे...
 
बातम्या आणखी आहेत...