आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक : आज मुख्यमंत्र्यांची, तर रविवारी उद्धव ठाकरेंच्या सभेवर सेना उमेदवारांची भिस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शिवसेना भाजपची युती असली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वतंत्रच जाहीर सभा होत आहेत. युतीच्या उमेदवारांचा प्रचारही आपापल्या पातळीवरच सुरू असून संयुक्त प्रचार कुठेही पाहायला मिळेनासा झाला आहे.
भाजपची भिस्त मुख्यमंत्र्यांच्या जयभवानीनगरातील चौकात होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या सभेवर आहे, तर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या रविवारच्या सांस्कृतिक मंडळावरील सभेकडे डोळे लावून बसली आहे.
तणातणी, वादावादी, खेचाखेचीच्या ११ बैठकांनंतर शिवसेना भाजपची युती एकदाची झाली खरी, पण प्रचारात संयुक्त प्रचार कोठेही पाहायला मिळालेला नाही. आतापर्यंतच्या महापालिका निवडणुकीत मतदानाच्या चार-पाच दिवस आधीपर्यंत दोन्ही पक्षांचे जाहीरनामेही प्रकाशित झालेले असत. यंदा युतीचे सारेच गाडे बिघडले आहे.

दोन्ही पक्षांनी जाहीर सांगितले असले तरी प्रत्यक्षात संयुक्त प्रचार कोठेही पाहायला मिळत नाही. उलट आपापल्या पक्षांच्या मित्रपक्षांसमोरील बंडखोरांना खतपाणी घालण्याचे उद्योग खुले आम सुरू आहेत. त्यामुळे युती नावापुरतीच उरल्याचे दिसत आहे. दोन्ही पक्षांनी आपापल्या पातळीवर प्रचाराचे नियोजन केले असून एकमेकांच्या फंदात पडता हा प्रचार सुरू आहे.
शिवसेना आदित्य ठाकरे, पालकमंत्री रामदास कदम, विनोद घोसाळकर, आ. नीलम गोऱ्हे यांच्या माध्यमातून प्रचाराचा धुरळा उडवत आहे.
रविवारी शिवसेना पक्षप्रुमख उद्धव ठाकरे यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सायंकाळी वा. सभा होणार आहे. या सभेकडे शिवसेनेच्या उमेदवारांचे लक्ष लागले आहे. मोजक्याच वाॅर्डांपुरते लक्ष देणाऱ्या स्थानिक नेत्यांमुळे त्यांचा प्रचार म्हणावा तसा होत नसल्याने ठाकरेंची सभा तरी आपल्याला तारेल, अशी त्यांना अपेक्षा आहे.
मुख्यमंत्र्यांची आज जयभवानीनगरात सभा

मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा या वेळी नसणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या शनिवारी सायंकाळी वाजता जयभवानीनगरच्या शिवाजी चौकात जाहीर सभा घेणार आहेत. त्यांच्या किमान तीन सभा घेण्याचे प्रयत्न भाजपने केले होते, पण त्यांच्याकडून तेवढा वेळ मिळू शकला नसल्याने एका सभेवर भागवावे लागत आहेत.