आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'क\' आणि \'ड\' वर्गातील महापालिकांची निवडणूक थेट जनतेतून घेण्याबाबत विचार- मुख्यमंत्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- नगराध्यक्षआणि सरपंच थेट जनतेतून निवडून देण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आलेला आहे. त्यापाठोपाठ राज्यातील आणि वर्गात समावेश असलेल्या महानगरपालिकांमध्ये थेट जनतेतून महापौर निवडण्याचा विचार सुरू आहे. या निवडीसंदर्भात अभ्यास करून निर्णय घेणार असल्याची घोषणा शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
 
अौरंगाबादेत मनपाच्या वतीने हॉटेल रामा इंटरनॅशनलमधील सीता हॉलमध्ये १०९ व्या दोनदिवसीय अखिल भारतीय महापौर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी त्याचे उद‌्घाटन झाले. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह महापौर परिषदेने जनतेतून महापौर निवडण्यावर विचार होणे अपेक्षित असल्याचे मत व्यक्त केले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले, आम्हाला थेट जनतेतून नगराध्यक्ष आणि सरपंच निवडीबद्दल अनेकांचा विरोध, टीका, टिप्पणी सहन करावी लागली. खासदार चंद्रकांत खैरे यांनाही विरोधासाठी तयार राहण्याचा सल्ला दिला. नगरसेवकांमधून महापौर निवडण्यात जी मजा होती ती थेट निवडीत नसणार असल्याचे सांगत काही वेळा विरंगुळा निर्माण केला. व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे, भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, मध्यप्रदेशचे महसूलमंत्री उमाशंकर गुप्ता, महापौर परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा ग्वाल्हेरचे महापौर विवेक शेजवळकर आदींची उपस्थिती होती. 

अभ्यास करून निर्णय घेणार : मुख्यमंत्री 
फडणवीसम्हणाले, राज्यात थेट जनतेतून नगराध्यक्ष आणि सरपंच निवडण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यानुसार आगामी निवडणुकांमध्ये अशा पद्धतीने निवड होईल. राज्यातील ९० टक्के मनपांच्या निवडणुका संपल्या आहेत. त्यामुळे लगेच नियमात सुधारणा करता येणार नाही. मनपा क्षेत्र मोठे असल्याने जनतेतून महापौर निवडीचे काम अत्यंत कठीण आहे. 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा.. मुख्यमंत्र्याना घेराव घालण्याचे समजताच नगरसेवक ताब्यात
बातम्या आणखी आहेत...