आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CMच्या गाडीत बसण्यावरून भाजप नेत्यांमध्ये गुद्दागुद्दी; ...अन् खैरेंची गाडी धडकली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या कारमध्ये बसण्यावरून भाजपचे नेते, माजी महापौर डॉ. भागवत कराड बसवराज मंगरुळे यांच्यात चक्क हाणामारी कॉलरला धरून खेचाखेची झाली. खुद्द मुख्यमंत्र्यांनी हा प्रकार पाहिला आणि ते चांगलेच संतापले त्यांनी दोघांनाही कारमधून उतरवत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना सोबत घेऊन ते निघून गेले.

तीन कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शहरात आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशीदेखील शहरात आल्याने फडणवीसांनी त्यांना भेटण्याचे निश्चित केले. त्यानुसार ते विमानतळावरून थेट सिडको एन मधील संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश पांडव यांच्या निवासस्थानी गेले. भैयाजी जोशी यांच्या प्रकृतीची विचारपूस करीत त्यांनी अर्धातास विविध विषयांवर चर्चा केली. त्यानंतर साडेदहाच्या सुमारास मुख्यमंत्री घराबाहेर आले आणि बाहेरचा प्रकार पाहून अवाक झाले.

बाहेर मुख्यमंत्र्यांसोबत आलेली भाजपची स्थानिक मंडळी उभी होती. मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या कारमध्ये बसण्यासाठी या नेत्यांत चढाओढ लागली होती. भाजपचे माजी महापौर डॉ. भागवत कराड माजी शहराध्यक्ष बसवराज मंगरुळे हे दोघेही कारमध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत होते. कराड यांना ओढून बाहेर काढत मंगरुळे यांनी अपशब्दही वापरले. यामुळे चिडलेल्या डॉ. कराडांनी त्यांना प्रत्युत्तर देत मंगरुळे यांना धक्काबुक्की केली. या वेळी उपस्थित असलेले आमदार अतुल सावे शहराध्यक्ष भगवान घडामोडे हे त्यांना सोडवायला गेले. हा सारा प्रकार पाहून मुख्यमंत्री चांगलेच संतापले. त्यांनी ना कराडांना कारमध्ये घेतले ना मंगरुळे यांना. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनाच कारमध्ये सोबत घेऊन ताफा निघून गेला. या प्रकाराची दिवसभर चविष्ट चर्चा रंगली होती. पण डॉ. कराड मंगरुळे या दोघांनीही असा प्रकार झालाच नाही, असे सांगितले. डॉ. कराड म्हणाले की, कुणी तरी जाणूनबुजून या अफवा पसरवत आहे, तर मंगरुळे यांनी तर आपण शहरातच नाही असे सांगत घटनेचा इन्कार केला.

बारवालांच्या गाडीला खैरेंच्या गाडीची धडक
सकाळीहा हाणामारीचा प्रकार घडला आणि दुपारी विचित्र अपघात झाला. सरस्वती भुवन संस्थेच्या शताब्दी सोहळ्याला हजेरी लावल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा स. भु. तून एमजीएमकडे रवाना झाला. सावरकर चौक ते सतीश पंप ते क्रांती चौकमार्गे एमजीएम असा मार्ग ठरला होता. कोटला कॉलनीत सतीश पेट्रोल पंपाजवळील वळणावर ताफा वेग कमी करत थांबला. या ताफ्यात शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेले गजानन बारवाल, शहराध्यक्ष भगवान घडामोडे संजय केणेकर हे एका गाडीत बसले होते. त्यांच्या मागे खासदार चंद्रकांत खैरे यांची गाडी होती. ताफ्यातील वाहने वेगात होती. पुढची वाहने थांबत असतानाच खैरे यांच्या गाडीने बारवालांच्या गाडीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. किरकोळ वादावादीनंतर प्रकरण मिटले. सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही. नंतर ही अपघातग्रस्त वाहने पुन्हा ताफ्यात शिरली पूढे रवाना झाली.

पुढे वाचा, सीएमला काळे झेंडे दाखवणार्‍यांना अटक...