आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांची रविवारी गंगापूर, पैठणला सभा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - १८ डिसेंबरला होणाऱ्या नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी या रविवारी (११ डिसेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यात चार नगर परिषदांच्या निवडणुका असल्या तरी मुख्यमंत्री फक्त पैठण आणि गंगापूर येथे प्रचार सभा घेणार आहेत. पक्षसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पैठण येथील नगर परिषद निवडणूक ही प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तर गंगापूरची निवडणूक आमदार प्रशांत बंब यांनी प्रतिष्ठेची केली आहे.
त्यामुळे येथे मुख्यमंत्री प्रचार सभा घेणार आहेत. खुलताबाद वैजापूर येथील स्थानिक नेता रेटा लावू शकला नाही. त्यामुळे दोन सभा घेऊन मुख्यमंत्री मुंबई गाठतील. पैठण येथे शिवसेनेसोबत भाजपची युती होऊ शकली नाही. तेथे मैत्रीपूर्ण लढत होत आहे. अन्य तीन ठिकाणी त्यांची युती झाली आहे. युती करता पैठण न.प. ताब्यात घेण्याचे प्रदेशाध्यक्ष दानवे यांचे प्रयत्न आहेत. बंब यांना गंगापूर नपवर वर्चस्व सिद्ध करायचे आहे.
बातम्या आणखी आहेत...