आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2019 पर्यंत पंतप्रधान आवास योजनेतून प्रत्येक गरिबाला मोफत घर देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर/ पैठण - २०१९पर्यंत पंतप्रधान आवास योजनेतून राज्यातील प्रत्येक गरिबाला मोफत घर देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी औसा येथे बाेलताना सांगितले. नगरपालिका निवडणुकीनिमित्त भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांच्या रविवारी औसा, पैठण, गंगापूर येथे जाहीर सभा झाल्या. या सभांतून मुख्यमंत्र्यांनी शहरी विकासावर भर दिला.
पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणाचे रस्ते अतिशय बोगस होत असल्याचे सांगत आपण स्वत: या रस्त्यांवरून धक्के खात आलो असल्याचे फडणवीस म्हणाले. रस्त्याची कामे दर्जेदार करावीत, असा सल्लाही त्यांनी दिला.

वाढत्या शहरीकरणाचा आढावा घेऊन फडणवीस म्हणाले, पूर्वीच्या सरकारांनी नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याने शहरे बकाल होत आहेत. लोकसंख्येनुसार शहरांत विकासकामे झाली नाहीत. पाणी, नाल्या व वीजपुरवठा या मूलभूत सुविधाही मिळाल्या नाहीत. कचऱ्याचे व्यवस्थापन नसल्याने रोगराई पसरत आहे. परंतु आता शहरांतील चित्र बदलेल. केंद्र व राज्य सरकारच्या वतीने शहर विकासासाठी अनेक योजना सुरू करण्यात आल्या असून, त्यातून अनेक प्रश्न सुटणार आहेत.
अाज पैठण बंदचे आवाहन
फडणवीस यांच्या सभेत घोषणाबाजी करणाऱ्या सकल मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन ठाण्यात ठेवले. याच्या निषेधार्थ सोमवारी पैठण बंदचे आवाहन करण्यात आले आहे. सभेत गोंधळ होण्याची शक्यता पाहून पोलिसांनी रविवारी शंभराहून अधिक कार्यकर्त्यांना ठाण्यात आणले होते. मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यास वेळ दिला जाईल, असे कार्यकर्त्यांना सांगितले गेले. मात्र मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू होताच काही कार्यकर्त्यांनी हातात फलक घेत ‘आधी मराठा आरक्षणाचा निर्णय घ्या’च्या घोषणा सुरू केल्या.
मनसेला जिल्हा खिंडार : पैठण येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मनसेचे जिल्हा अध्यक्ष डॉ सुनिल शिंदे, गणेश औताडे, अप्पासाहेब सोलाट यांनी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला.
५० दिवसांनंतर आर्थिक स्वातंत्र्य
भ्रष्टाचार, आतंकवाद रोखण्यासाठी व काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधानांनी मोठ्या नोटांवर बंदी घातली. ही स्वातंत्र्याची लढाई असल्याने नोटाबंदीच्या ५० दिवसांनतर सगळे सुरळीत होणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
विकासाची हीच त्रिसूत्री
महाराष्ट्रातील नगर पालिकांमध्ये पारदर्शक कारभारासाठी पारदर्शकता, गुणवत्ता आणि गतिशीलता या त्रिसूत्रीचा अवलंब करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी गंगापूर येथील सभेत सांगितले.
पुढील स्‍लाइडवर वाचा, औशात १३ कार्यकर्ते ताब्यात
बातम्या आणखी आहेत...