आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात मंत्रिमंडळ बैठक अन् विस्तारही लवकरच; मुख्यमंत्री फडणवीस यांचे संकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारापाठोपाठ राज्यातही मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच करण्यात येणार आहे. तसेच मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक घेणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिले. 

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री फडणवीस शहरात आले होते. सिद्धार्थ उद्यान येथे ध्वजारोहण झाल्यानंतर त्यांच्या हस्ते सहकार नगरातील एका सोलार ऊर्जेच्या दालनाचे उद््घाटन करण्यात आले. या वेळी त्यांनी पत्रकाराशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले, औरंगाबाद शहरात मंत्रिमंडळ बैठक घेण्यात येणार आहे. मात्र ती केव्हा होणार याविषयी भाष्य केले नाही. मंत्रिमंडळ विस्तारात कोणाची वर्णी लागेल या प्रश्नावर ते म्हणाले, प्रत्येक मंत्र्याचा केआरए बघून निवड करण्यात येईल. केआरए तपासण्यासह मंत्र्यांना एक प्रश्नावली देण्यात आली आहे. यात प्रावीण्य मिळवणाऱ्या मंत्र्याचा विचार करण्यात येईल. तसेच नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. राज्यात सुरू असलेल्या भारनियमनविषयी विचारले असता त्यांनी उत्तर देणे टाळले. या वेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, आमदार सुभाष झांबड, उद्योजक मानसिंग पवार, विवेक देशपांडे, राम भोगले, संजय केणेकर, शिरीष बोराळकर उपस्थित होते. 

दरम्यान, औरंगाबादमध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत स्वतंत्र मराठवाड्याचा निर्णय घेण्याची मागणी स्वतंत्र मराठवाडा संघर्ष समितीचे निमंत्रक जे.के. जाधव यांनी केली आहे. स्वतंत्र मराठवाड्याच्या चर्चेसाठी ३० मिनिटे वेळ मागितल्याचे जाधव म्हणाले. 

तातडीने बैठक घ्या 
मराठवाड्यातदरवर्षीप्रमाणे मंत्रिमंडळ बैठक घेण्यात यावी, अशी मागणी मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष अॅड. प्रदीप देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून केली. परिषदेच्या वतीने मंत्रिमंडळासमोर मराठवाड्याच्या प्रश्नांबाबत सादरीकरण करण्यात येते. 
 
मुख्‍यमंत्र्यांनी मंत्र्यांना पाठवली प्रश्‍नावली, उत्‍तरे तपासून घेणार निर्णय
मुख्‍यमंत्री प्रत्‍येक मंत्र्याचा 'केआरए' रिपोर्ट पाहून व त्‍यांच्‍या कामगिरीचे मुल्‍यमापन करुन मंत्रिमंडळाचा विस्‍तार करणार असल्याची शक्‍यता आहे. मंत्र्यांच्‍या कामगिरीनुसार त्‍यांना बढती व पदावनती देण्‍यात येणार आहे.  यासाठी मुख्‍यमंत्री फडणवीस यांनी मं‍त्रिमंडळातील मंत्र्यांना एक प्रश्‍नावली पाठवली असून त्‍याची उत्‍तरं मागविली आहे. ही उत्‍तरं तपासून नवरात्रीनंतर मुख्‍यमंत्री मंत्रिमंडळ विस्‍ताराची घोषणा करु शकतात, अशी शक्‍यता आहे. 
बातम्या आणखी आहेत...