आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्याला समन्यायी पद्धतीने पाणी : मुख्यमंत्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मराठवाड्याला समन्यायी पद्धतीने पाणी सोडले जाईल. शासनाची ही भूमिका आहे. यापूर्वी असेच पाणी सोडल्याने जायकवाडीत उन्हाळ्यातही पाणी राहिले. यापुढेही गरजेनुसार पाणी सोडले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले.

जलयुक्त शिवार अभियानाचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. मराठवाड्याच्या संस्था नागपूरला नेण्यात येत असल्याच्या मुद्द्यावर ते म्हणाले, मराठवाड्यात मोठ्या संस्था आणणार आहोत. नॅशनल लाॅ स्कूलची फक्त घोषणा झाली होती. आम्ही सकारात्मक काम करणार आहोत. उस्मानाबाद विद्यापीठाबाबत माझ्याकडे मागणी आलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

आमदारांना आयकार्डवर प्रवेश : जिल्हाधिकारी कचेरीतील बैठकीत अधिकाऱ्यांनाही आयकार्डवरच प्रवेश होता. आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनाही ओळखपत्र दाखवल्यावरच प्रवेश मिळाला.

तीन आमदार गैरहजर : जिल्ह्यातील संजय शिरसाट, अतुल सावे व हर्षवर्धन जाधव बैठकीला गैरहजर होते. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार प्रशांत बंब, संदिपान भुमरे, इम्तियाज जलील, भाऊसाहेब चिकटगावकर, सुभाष झांबड उपस्थित होते.

१७ सप्टेंबरपूर्वी मंत्रिमंडळाची बैठक
मागील काही वर्षांपासून खंडित झालेली मराठवाड्यातील मंत्रिमंडळाची बैठक १७ सप्टेंबरपूर्वी घेण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. याशिवाय विदर्भ, कोकणातही मंत्रिमंडळ बैठक घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. २००८-०९ नंतर ही बैठक झालेली नाही. नागपूर कराराप्रमाणे ही बैठक दरवर्षी व्हावी, असे मराठवाडा जनता विकास परिषदेचे सरचिटणीस शरद अदवंत यांनी म्हटले आहे.