औरंगाबाद- जपानदौऱ्यासाठी मंगळवारी मुख्यमंत्री राज्यातील उद्योजकांची टीम घेऊन निघाले आहेत. रात्री दहा वाजता त्यांचे विमान सिंगापूरला थांबले, तेव्हा तेथे त्यांनी मराठवाड्यातील १२ उद्योजकांसोबत मराठवाड्यात पडलेला दुष्काळ आणि विकासाच्या एकूण १२ मुद्द्यांवर चर्चा केली.
मुख्यमंत्र्यांच्या जपान दौऱ्यात औरंगाबादचे सीएआयए सीआयआयचे सदस्य आहेत. यात राम भोगले, विवेक देशपांडे, आशिष गर्दे, मुनीष शर्मा, मिलिंद कंक, उमेश दाशरथी, रवी वैद्य, सुनील किर्दक, एन. श्रीराम, रवींद्र बिंद्रा, खुशबीर बिंद्रा या १२ उद्योजकांचा समावेश आहे.
४५मिनिटे बैठक : मंगळवारीरात्री दहाच्या सुमारास सिंगापूर येथे विमान दोन तास थांबल्यावर मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील उद्योजकांशी ४५ मिनिटे संवाद साधला. यात मराठवाड्यातील दुष्काळ, हातची गेलेली पिके, पाणीटंचाई यासह सिडकोचा विकास आराखडा, स्मार्ट सिटी नवे क्लस्टर यासह विविध विषयांवर चर्चा केली.