आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cm Prithviraj Chavan Flag hoisting For Haidarabad Muktisangram Day At Siddharth Garden

मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- भारताच्यास्वातंत्र्याला हैदराबाद मुक्तिलढ्याने पूर्णत्व आणले. तेव्हा मुलींनो, खूप शिका, मोठ्या व्हा, समाज घडवा, असे आवाहन ताराबाई मेढेकर यांनी केले. हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्यसैनिक द. रा. मेढेकर, ताराबाई मेढेकर दांपत्याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. त्यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामातील रोमांचक प्रसंग सांगितले. या वेळी प्रशालेच्या गीत मंचच्या विद्यार्थिनींनी संगीत शिक्षिका संध्या कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली हैदराबाद मुक्तगिरीत स. भु. शिक्षण संस्थेचे संस्था गीत गायले. वैशाली देशपांडे यांनी मुक्तिसंग्राम लढ्यातील स्त्रियांच्या धाडसी कार्यावर प्रकाश टाकला. मुख्याध्यापिका प्रतिभा काकडे, उपमुख्याध्यापिका सुरेखा देव, उज्ज्वला जाधव, लता मुखेडकर आदींची उपस्थिती होती. अनुराधा पांडे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

मुलींनो, जास्तीत जास्त शिका आणि समाज घडवा : ताराबाई मेढेकर
निझामाच्या राजवटीतून मराठवाड्याला मुक्त करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना हैदराबाद मुक्तिसंग्रामदिनी बुधवारी (१७ सप्टेंबर) अभिवादन करण्यात आले. शहरातील विविध शाळा, संस्था, संघटना, महाविद्यालयांत आयोजित कार्यक्रमांत स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागावर प्रकाश टाकण्यात आला.

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर
सिडकोन्यू गणेशनगर येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिरातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दीपमाला जाधव होत्या. मुख्याध्यापिका यशोदा जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या वेळी अर्जुन रसाळ आणि विद्यार्थी उपस्थित होते. आभार गणेश दळवी यांनी मानले.

रवींद्रनाथ टागोर शाळा
समर्थनगरयेथील रवींद्रनाथ टागोर माध्यमिक शाळेत संस्थेचे सचिव महेंद्र खानापूरकर यांच्या हस्ते हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका प्रभा पाटील होत्या. या वेळी शालेय विद्यार्थ्यांची भाषणे झाली.
मराठा हायस्कूल
विवेकानंदशिक्षण संस्था संचालित मराठा हायस्कूलमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राघवेंद्र यत्नाळकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक एल. टी. म्हस्के, उपमुख्याध्यापिका एस. बी. पाटील, पर्यवेक्षक जे. आर. पुनवटकर यांची उपस्थिती होती. या वेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते, अंधश्रद्धा निर्मूलन, सर्वधर्मसमभाव, वैज्ञानिक दृष्टिकोन, दहशतवादी हल्ला, सार्वजनिक स्वच्छता आदी विषयांवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. एम. वाळके यांनी केले, तर आभार जे. आर. पुनवटकर यांनी मानले.

विश्वकर्मा विद्यामंदिर
विश्वकर्माविद्यामंदिरामध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष पंजाबराव वडजे, लताताई वडजे यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बा. आ. राहाटे होते. पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनंदा कुपटकर यांनी केले. प्रास्ताविक एन. जी. मोरे यांनी केले. कार्यक्रमाला उपमुख्याध्यापिका सुरेखा जाधव, परागबाई वडजे यांची उपस्थिती होती.

करुणा बालक मंदिर
संजयनगर-मुकुंदवाडीयेथील करुणा बालक मंदिरात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी. जे. गाडेकर होते. प्रमुख पाहुणे नानासाहेब शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी अहिरे, शिंदे, पाटील होते. सूत्रसंचालन पांढरे यांनी केले, तर आभार नितीन पाटील यांनी मानले.

महर्षी विद्यालय
शालेयसमितीच्या अध्यक्षा संस्थेच्या संचालिका गीता चिंचोरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी संस्थेचे कार्याध्यक्ष एस. एम. कुलकर्णी, खंडागळे, जोशी, सुषमा देशपांडे यांची उपस्थिती होती. पहिली ते चौ थीच्या विद्यार्थ्यांनी "उठा राष्ट्रवीर हो' तर पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी "हे शिवसुंदर' या समूहगीतांचे सादरीकरण केले. सुषमा पोफळे, बाजीराव सोनवणे यांनी मुक्तिसंग्रामाबद्दल माहिती दिली. अंकुश तांबे यांनी सूत्रसंचालन केले आभार मानले.
फोटो धर्मवीर नावाने स्कॅन फोल्डरला आहे.

धर्मवीर संभाजी विद्यालय
प्रमुखपाहुणे म्हणून श्रीराम लक्ष्मण वरूडकर, तर अध्यक्षस्थानी डॉ. श्रीराम देशपांडे यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तिपर गीतगायन केले. प्राचार्य भारत देवतळे यांनी प्रास्ताविक केले. बाबासाहेब काकडे यांनी सूत्रसंचालन केले, तर अमोल साळवे यांनी आभार मानले.

ज्ञानांकुर विद्यालय
कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका शारदा गोंडे पाटील होत्या. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. इयत्ता सातवीच्या मेधा देशपांडे, दहावीच्या निखिल वायकोस, नववीच्या वैष्णवी बडक यांनी मनोगत व्यक्त केले. गोंडे पाटील यांनी मुक्तिसंग्राम दिनाचे महत्त्व विशद केले. या वेळी अंकुर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. स्नेहा हत्ते यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान, अंकुर बालक मंदिर आणि किड्स केंब्रिज इंग्लिश स्कूलमध्येही हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा करण्यात आला.

साई इंजिनिअरिंग
श्रीसाई इंजिनिअरिंग महाविद्यालयात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त सकाळी आठ वाजता प्राचार्य बी. एम. खरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी अनुविद्युत विभागप्रमुख प्रा. पी.बी. कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान महाविद्यालयाच्या परिसरात २० वृक्षांचे रोपण करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. धम्मपाल पालमकर यांनी केले. या वेळी प्रा.के.टी. प्रधान, प्रा.पी.बी.वाघमारे, प्रा. पी.पी.परिहार, प्रा.व्ही.आर.सपकाळ, प्रा.एन.पी. पाटील, प्रा.स्वाती सरोवर, ए.एस. माने, प्रा. पी.एस.घोंगडे, कर्मचारी प्रकाश सन्सांसे यांची उपस्थिती होती.

श्रुतीवाणी विकास विद्यालय
अपंगजीवन विकास आणि संशोधन मंडळ संचलित श्रुती वाणी विकास विद्यालयात हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून सहायक जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी ओ.एन. वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांना खादी ग्रामोद्योगाच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली खाऊचे वाटप करण्यात आले. या वेळी संस्थेचे सचिव अनिल संवत्सर, संतोष कुलकर्णी यांची उपस्थिती होती. मुख्याध्यापक कैलास धावणे यांनी आभार मानले.

नालंदा विद्यालय
मुकुंदवाडीयेथील नालंदा विद्यालयात झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य एम. पी. जाधव यांनी ध्वजारोहण केले. प्रमुख पाहुणे म्हणून ए. एस. राठोड होते. मुख्याध्यापक एस. एस. पैठणे यांनी आभार मानले.

हेरंब प्राथमिक शाळा
मराठवाडामुक्तिसंग्राम दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शैलेंद्र विटोरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पूजा पऱ्हे, लंका कोल्हे, पी. जी. पवार, विनोद पाटील नरवडे, जगदीश खैरनार उपस्थित होते.

गणपतरावजगताप शाळा
मुकुंदवाडीतीलगणपतराव जगताप प्राथमिक विद्यामंदिरात मुख्याध्यापक आर. एफ. गांगुर्डे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून चिकणे, शिंदे, वनारसे, मगर होते. सूत्रसंचालन देशमुख यांनी केले. आभार एल. एम. शेख यांनी मानले.

अकबर खान पटेल शाळा
सातारायेथील अकबर खान पटेल मराठी शाळेत हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षस्थानी बहादूर खान पटेल यांची, तर प्रमुख पाहुणे म्हणून जफर पटेल यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश ठाकूर यांनी केले, तर आभार सैफ यांनी मानले.

लिटिलस्टार प्ले स्कूल
मीरानगरपडेगाव येथील लिटिल स्टार प्ले स्कूलमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. तसेच भाषण स्पर्धा घेण्यात आली. या वेळी अध्यक्षस्थानी सोमनाथ पवार होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून अप्पासाहेब जोशी भिकाजी गायकवाड यांची उपस्थिती होती. शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा चोपडे, अनिता रोकडे, लक्ष्मी कोमरे यांच्यासह शिक्षकांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन आरती जोशी यांनी केले.

श्रीबालाजी विद्यामंदिर
कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी चंद्रकला जाधव यांनी ध्वजारोहण केले. विद्यार्थ्यांना मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनाची माहिती दिली. प्रमिला चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन वंदना गवळी यांनी तर आभार मनीषा पाटील यांनी मानले.

रेणुका हायस्कूल
सातारापरिसरातील रेणुका हायस्कूलमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका एम. एन. वाघुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे शिक्षक एम. व्ही. हराळे, आर. बी. महाजन, सी. एन. शेरकर, बी. ए. शिंदे, व्ही. एच. रोडगे, एस. एस. नागलबोने, वाय. डी. त्रिभुवन, यु. जी. चव्हाण आदींची उपस्थिती होती.

स्वामीसमर्थ विद्यामंदिर
कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी संस्थेचे कोशाध्यक्ष योगेश मोटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक विभागाचे जी. सी. वरकड, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक जी. यु. दगि्रसकर आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन दीपाली पुरमवार यांनी तर आभार पी. ए. पवार यांनी मानले.

उज्ज्वलाताईपवार विद्यालय
रामनगरयेथील उज्ज्वलाताई पवार विद्यालयात हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आनंदा सूर्यवंशी, तर प्रमुख पाहुण्या म्हणून अनिता पवार यांची उपस्थिती होती. पाहुण्यांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते आणि समूहगीते सादर केली. उत्कृष्ट भाषण करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. शिक्षक विश्वास डावकर यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन अश्विनी घडामोडे यांनी केले, तर आभार अनिल तुपे यांनी मानले.

छत्रपती हायस्कूल
गारखेडापरिसरातील छत्रपती हायस्कूलमध्ये सकाळी संस्थेचे अध्यक्ष सुभाष पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी राजाराम मोरे, अशोक बादल, अभिमन्यू खंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन जे. पी. शिंदे यांनी केले. आभार टी. डी. शिंदे यांनी मानले. तसेच मुख्याध्यापक राजेंद्र चव्हाण, आर. एस. आंधळे, बी. पी. मारग, ए. एम . कांबळे, यू. डी. जाधव, जे. डी. म्हस्के, एल. बी. पाटील, ए. एस. पाटील, एम. बी. जाधव यांची उपस्थिती होती.